Advertisement

गाववाल्यांनू तुमचा आमच्यावर भरवसा नाय काय?


गाववाल्यांनू तुमचा आमच्यावर भरवसा नाय काय?
SHARES

सोनूच्या गाण्याने लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच वेड लावलंय. मलिष्काच्या 'मुंबई तुझा BMC वर भरोसा नाय काय?' या गाण्यानंतर तर सगळीकडेच सोनू या गाण्याचे वेगवेगळे वर्जन पाहायला मिळू लागलेत. शाळेच्या वर्गापासून ते कॉलेज कट्ट्यापर्यंत सर्वच मंडळी सोनूचं गाण करू लागलेत. मग आता या सगळ्यात आपली कलाकार मंडळी तरी कशी मागे राहतील.

आता सोनू चक्क मालिका आणि नाटकाच्या प्रमोशनलाच उतरलाय. त्याचं होतंय असं की, आता कलाकार मंडळी आपल्या मालिकेच्या, नाटकाच्या प्रमोशनसाठीही खास 'सोनू'च्या चालीचं गाणं तयार करू लागले आहेत आणि ते प्रमोशनल साँग म्हणून त्यांच्या प्रोफाईलवर शेअर केलं जातंय. खूप कमी वेळात या गाण्यांना प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसादही मिळू लागलाय.

सुशांत शेलारच्या सध्या सुरु असलेल्या एकच प्याला या नाटकाच्या नावावरून टीमने सोनूच्या चालीवर एक गाणं बनवलंय.


सगळीकडेच तरुणमंडळी गंमत म्हणून हे गाणं आपापल्या पद्धतीने म्हणतायत आणि आपल्या ग्रुपला प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न करतायत. आमच्या टीमने ही विचार केला की आपण पण अशा पद्धतीने नाटकाच्या नावाचा उपयोग करून असं एखादं गाणं बनवावं. प्रमोशनल साँग म्हणूनच हे गाणं बनवण्यात आलं. टीममधल्या सगळ्यांनी एकत्र येऊन आम्ही हे गाणं लिहिलं आहे. आणि खूप कमी वेळात आमच्या व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. काही दिवसातच त्या व्हिडीओला ८९ हजाराच्यावर व्ह्यूज मिळाले आहेत. लोकांना हे गाणं आवडतंय आणि व्हिडिओवर आलेल्या कमेंट्समधून आम्हाला ते दिसतंय. 

सुशांत शेलार, अभिनेता

हे असंच काहीसं गाणं झी मराठी वरील नवीन मालिका 'गाव गाता गजाली' या मालिकेच्या टीमनेसुद्धा बनवलंय. 'गाववाल्यांनू तुमचा आमच्यावर भरवसा नाय काय?' असे या गाण्याचे बोल आहेत. आणि हे गाणं फार कमी वेळात चांगलंच व्हायरलही होत आहेत.

ते गाणं खूप गमतीशीर आहे. एका एका वाक्याने ते गाणं वाढत जातं. आमच्या 'गाव गाता गजाली' या मालिकेमध्येही तसंच आहे. एखादी गोष्ट हळू हळू करून वाढत जाते. म्हणून आम्ही हे गाणं बनवलं. हे संपूर्ण गाणं मी स्वतः लिहिलं आहे. आणि त्यात कोकणातल्या गोष्टी आणण्याचा प्रयत्न केलाय. खूप कमी वेळात या व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळतोय. खूप लोकांना हे गाणं आवडतंय आणि खूप शेअरही व्हायला लागलंय. काहींनी तर पुन्हा तेच गाणं मलाच शेअर केलंय. त्यामुळे प्रमोशनसाठी या गाण्याचा नक्कीच उपयोग होतोय.

प्रल्हाद कुडतरकर, अभिनेता-लेखक-दिग्दर्शकडाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा