Advertisement

डेंग्यूच्या अळ्या, राजकारण आणि आरजे मलिष्काचा इशारा!


डेंग्यूच्या अळ्या, राजकारण आणि आरजे मलिष्काचा इशारा!
SHARES

'मुंबई तुला मायावर भरोसा नाय काय'... या गाण्यातून मलिष्काने मुंबई महानगरपालिकेला चांगलेच डिवचले. त्यानंतर आता मलिष्का शिवसेना आणि महापालिकेच्या रडारवर असल्याचे दिसत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना तपासणीदरम्यान मलिष्काच्या घरात डेंग्यूच्या अळ्या आढळल्या आहेत. या प्रकरणी मुंबई महानगरपालिकेने मलिष्काला नोटीस बजावली आहे.


शोभेच्या कुंड्यांखाली ठेवलेल्या डिशमध्ये अळ्या

मलिष्का वांद्रे पश्चिमेकडील पाली नाका येथील सन राईज इमारतीत राहते. एच वेस्ट कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी या इमारतीमध्ये तपासणी केली. तेव्हा लिली मेंडोंसा यांच्या घरात डेंग्यूच्या अळ्या सापडल्या. 65 वर्षांच्या लिली मेंडोंसा या मलिष्काची आई असल्याची माहिती मिळाली आहे. तिच्या घरात असलेल्या शोभेच्या कुंड्यांखाली ठेवलेल्या डिशमध्ये या अळ्या सापडल्या आहेत. याप्रकरणी नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी सभागृह नेते यशवंत जाधव यांनी केली आहे.


'डेंग्यूच्या अळ्या साफ झाल्या नाही तर...'

मुंबई महापालिकेने बजावलेली ही पहिली नोटीस आहे. या नोटीसमध्ये डेंग्यूच्या अळ्या साफ करा, अशी सूचना करण्यात आली आहे. या नोटीसनंतरही जर डेंग्यूच्या अळ्या साफ झाल्या नाही, तर दुसऱ्यांदा नोटीस बजावण्यात येते. तरीही कोणतीही कारवाई न झाल्यास महापालिकेकडून मलिष्काला दंड ठोठावण्यात येईल. असेही महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.


मुंबईतले खड्डे, लोकलचं वेळापत्रक आणि कायम खोळंबणारं ट्रॅफिक या तीन मुद्द्यांना धरुन 'सोनु तुला माझ्यावर भरोसा नाय का' या गाण्यावरुन मलिष्कानं 'मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय का' हे उपहासात्मक गाणं बनवलं होतं.


 


मलिष्काला मुंबईवर भरोसा हाय!

दरम्यान, या सर्व प्रकरणानंतर मलिष्कानं ट्विटरवर प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईकरांनी या प्रकरणात मलिष्काला पाठिंबा दिल्याबद्दल मलिष्कानं मुंबईकरांचे आभार मानले आहेत. शिवाय 'मुंबई, मला तुझ्यावर भरोसा आहे' असंही मलिष्का ट्विटमध्ये म्हणते.



मलिष्काने हे ट्विट केल्यानंतर त्यावर उलट-सुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. काहींनी तिला पाठिंबा दिला असला, तरी काही नेटिझन्सनी मात्र तिच्यावर तोंडसुख घेतलं आहे...





काही नेटिझन्सनी मलिष्काने केलेल्या मराठी गाण्यांच्या विरोधाच्या मुद्द्यावरून तिला ट्रोल करायचा प्रयत्न केला आहे...




दरम्यान या वादात आता राजकारण्यांनीही उडी घेतली आहे. मलिष्काला पाठिंबा देत काँग्रेस नेते नितेश राणे यांनीही बीएमसी आणि पर्यायाने शिवसेनेला टार्गेट करण्याची संधी साधली आहे. तर भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी मलिष्काला पाठिंबा देत 'ते तिचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे' अशी टिप्पणी केली आहे.



याशिवाय संभाजी ब्रिगेडनेही या वादात उडी घेत मलिष्काला पाठिंबा दर्शवण्यासाठी एक पत्रकच जारी केलं आहे. 'आर जे मलिष्काने बनवलेले गाणे हे मुंबईतील सामान्य लोकांच्या प्रश्नावर आहे. हाच विषय घेऊन आम्ही बृहनमुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवली होती. परंतु, मलिष्काने जर सर्वसामान्यांचा प्रश्न असा गाण्यातून मांडला असेल तर त्यात दोष काय?' अशी भूमिका या पत्रकातून मांडण्यात आली आहे.

या सर्व प्रतिक्रियांनंतर आयफा अवॉर्डसाठी न्यूयॉर्कमध्ये असलेल्या मलिष्काने तिला विरोध करणाऱ्यांनाच उलट चॅलेंज दिलं आहे...मी परत येईपर्यंत वाट पहा असं मलिष्का म्हणतेय..





हेही वाचा -

सावधान! डेंग्यू वेगाने पसरतोय

डेंग्यू पालिकेचे अपयश?


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा