डेंग्यूच्या रूग्णांमध्ये 76 टक्के पुरूषांचा समावेश


SHARE

मुंबई- मुंबईत डेंग्यूच्या तापाने थैमान घातले असून तीन आठवड्यात डेंग्यूचे 296 रूग्ण आढळले आहेत. तर 9,796 जण तापाने त्रस्त असून मलेरियाच्या रूग्णांची संख्या तीन आठवड्यात 717 इतकी झाली आहे. तसंच लेप्टोचे 30 रूग्ण आढळले आहेत. महत्त्वाचे म्हणजे डेंग्यूच्या रूग्णांमध्ये सर्वाधिक संख्या ही पुरूषांची आहे. स्त्रियांमध्ये डेंग्यूची लागण कमी प्रमाणात दिसते. डेंग्यूची लागण झालेल्या रूग्णांमध्ये 225 अर्थात 76 टक्के पुरूष तर 24 टक्के अर्थात 26 स्त्रिया आहेत. महत्त्वाचे म्हणजे 15 ते 29 वयोगटातील पुरूषांना डेंग्यूची लागण सर्वाधिक झाल्याचे आढळून आले आहे.

गेल्या वर्षी सप्टेंबर 2015 मध्ये 248 रूग्णांना डेंग्यूची लागण झाली होती. यंदा मात्र सप्टेंबरच्या तीन आठवड्यापर्यंत डेंग्यूचे 296 रूग्ण आढळले आहेत. म्हणजेच गेल्या वर्षींच्या तुलनेत डेंग्यूच्या रूग्णांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षी डेंग्यूचे 3,977 संशयित रूग्ण आढळले होते, तर यंदा 26 सप्टेंबरपर्यंत 3,287 संशयित रूग्णांवर पालिकेच्या रूग्णालयात उपचार सूरू आहेत. यंदा डेंग्यूचा फैलाव मोठ्या प्रमाणात झाला असल्याने नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन पालिकेकडून वारंवार केले जात आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या