Advertisement

'संभळंग ढंभळंग' वाजणार स्विस रेडिओवर!


'संभळंग ढंभळंग' वाजणार स्विस रेडिओवर!
SHARES

टियाना प्रोडक्शनचं १५ एप्रिल २०१८ ला रिलीज झालेलं आणि आदर्श शिंदेंनी गायलेलं ‘संभळंग ढंभळंग’ हे गाणं उभ्या महाराष्ट्रात गेला महिनाभार गाजलं. पण विशेष बाब म्हणजे हे गाणं स्विस रेडियो स्टेशन ‘रिपब्लिक कलकुटा’लाही खूप आवडलं आहे. 'रिपब्लिक कलकुटा'कडून हे गाणं त्यांच्या नॅशनल टेलिव्हिजन चॅनल आणि रेडियो स्टेशनच्या प्लेलिस्टमध्ये चालवण्यासाठी मागवण्यात आलं आहे. असं आमंत्रणं मिळालेलं ‘संभळंग ढंभळंग’ हे पहिलं मराठी गाणं आहे.



टियानाचं पहिलंच गाणं!

यासंदर्भात संपर्क केल्यावर टियाना प्रॉडक्शनचे संस्थापक संचालक सुजीत जाधव म्हणाले, “हे आमच्या प्रॉडक्शनचं पहिलंच गाणे आहे. आदर्श शिंदेंनी गायलेल्या या गाण्याला प्रेक्षकांची दाद मिळेल, असा आम्हाला विश्वास होता. पण महाराष्ट्रात ते एवढं गाजेल असं वाटलं नव्हतं. या आनंदातच आता जगविख्यात स्विस रेडियो स्टेशनकडून आपणहूनच आमच्या गाण्याला त्यांच्या प्लेलिस्टमध्ये चालवण्यासाठी मिळालेलं आमंत्रण म्हणजे आमच्यासाठी दुग्धशर्करा योगच म्हणायला हवा.”


स्विस रेडिओचं आलं निमंत्रण!

ते पुढे सांगतात, “रिपब्लिक कलकुटा हे स्वित्झर्लंडमधलं प्रतिष्ठित आणि लोकप्रिय रेडियो स्टेशन आहे. त्यांच्याकडून आम्हाला आमंत्रण येणं ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. देश-विदेशातली निवडकच गाणी या रेडियो स्टेशनवर चालतात. आणि त्यांची संगीत जाणकारांची टीम गाण्यांची निवड करते. अशा वेळी 'संभळंग ढंभळंग'ला हा मान मिळणं, ही नक्कीच अभिमानाची गोष्ट म्हणायला हवी.”


हेही वाचा

होय, बाॅलिवूडमध्ये होतं कास्टिंग काऊच- आलिया भट


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा