Advertisement

मास्टर ब्लास्टरने दिदींना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!


मास्टर ब्लास्टरने दिदींना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
SHARES

वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षापासून ते आजपर्यंत आपल्या आवाजाने सर्वांनाच मोहित करून टाकणाऱ्या गानसाम्राज्ञी आणि भारतरत्न पुरस्काराने सन्मानित दिदी म्हणजेच लता मंगशकर यांचा गुरुवारी 28 सप्टेंबरला 88 वा वाढदिवस!

त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक सेलिब्रिटींनी त्यांना ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत. लता दिदींना आईचे स्थान देणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यानेही त्यांना ट्विटरवर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

तो आपल्या ट्विटमध्ये म्हणतोय, 'जगातील उत्कृष्ट आवाज आम्हाला लाभल्याबद्दल आम्ही भाग्यवान आहोत'. सचिनच्या या ट्विटला आतापर्यंत 3 हजारांपेक्षा अधिक लाईक्स मिळाले आहेत.


30 हजारांहून अधिक गाणी

लतादिदी आज 88 वर्षांच्या झाल्या असल्या, तरी त्यांच्या आवाजातला तरुणपणा आजूनसुद्धा किंचतही कमी झालेला नाही. 1950 च्या दशकापासून ते आजपर्यंत बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींना त्यांनी आपला आवाज दिला आहे. त्यांनी आजपर्यंत 30 हजारापर्यंत गाणी गायली आहेत. याचसोबत 30 हून अधिक भाषांमध्ये त्यांनी पार्श्वगायन केले आहे.



हेही वाचा - 

गानविश्वाच्या अनभिषिक्त सम्राज्ञी...लता मंगेशकर!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा