Pali Hill
  भाड्यापोटीच्या 75 टक्के महसुलावर सोडले पाणी

  भाड्यापोटीच्या 75 टक्के महसुलावर सोडले पाणी

  Share
  Now
  मुंबई  -  

  मुंबई - एमएमआरडीएनं एका खासगी संस्थेच्या कार्यक्रमासाठी आपल्या लाखों रुपयांच्या महसुलावर पाणी ओतण्याचा निर्णय घेतला आहे. ग्लोबल इंडिया संस्थेतर्फे 19 नोव्हेंबरला एमएमआरडीए मैदानावर कोल्ड प्ले वाद्यवृंदाचा कार्यक्रम रंगणार आहे. या कार्यक्रमासाठी एमएमआरडीएने 75 टक्क्यांची खसखशीत भाडे सवलत दिली आहे. तर दुसरीकडे या कार्यक्रमांसाठी पाच हजार ते पाच लाख असे तिकीट असताना या कार्यक्रमासाठी करमणूक करातही सवलत देण्याच्या विचारात राज्य सरकार असल्याचंही समजतं. एमएमआरडीए-सरकार या संस्थेवर इतके का मेहेरबान आहेत? असा सवाल करत मुंबई ग्राहक पंचायतीनं यावर आक्षेप घेतला आहे.

  ग्राहक पंचायतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्र पाठवत सरकारनं एका खासगी संस्थेसाठी आपला महसूल बुडवू नये अशी मागणी केली आहे. तर या मागणीकडं काणाडोळा झाला तर याप्रकरणी न्यायालयात धाव घेण्याचा इशाराही दिला आहे. दरम्यान राजकीय दबावाला बळी पडत ग्लोबल इंडियावर ही मेहरबानी दाखवली जात असल्याची माहिती पंचायतीचे कार्याध्यक्ष अॅड. शिरीष देशपांडे यांनी दिली आहे.

  Share
  Now
  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.