सिनेमाच्या मोहजाळात बारा राशी ‘आलंय माझ्या राशीला‘चा मुहूर्त


SHARE

प्रत्येकाच्या जीवनावर राशींचा प्रभाव असतो हे आपण नेहमीच ऐकत असतो. कित्येकजण याचा अनुभवही घेत असतात. असाच वास्तववादी अनुभव आता मनोरंजनाच्या माध्यमातून रूपेरी पडद्यावर पहायला मिळणार आहे.

दिग्दर्शक अजित शिरोळे यांच्या दिग्दर्शनाखाली बनणाऱ्या आणि ‘आनंदी वास्तू’ फेम वास्तुविशारद आनंद पिंपळकर यांच्या निर्मिती संकल्पनेतून ‘आलंय माझ्या राशीला’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच दादर येथील प्लाझा सिनेमागृहात या सिनेमाचा मुहूर्त करण्यात आला. शिरोळे यांनी लाईट्स, कॅमेरा, अक्शन म्हणताच कामेडीक्वीन निर्मिती सावंत यांनी मुहूर्ताचा क्लॅप दिला. याप्रसंगी या सिनेमाचे सहनिर्माते दिलीप जाधवही उपस्थित होते. राशींच्या गुणधर्मानुसार व्यक्तीचा स्वभाव असतो, अशी ज्योतिषशास्त्रात मान्यता आहे.

या राशींच्या वैशिष्ट्यातून अनेक गमतीजमती घडत असतात. अशाच बारा राशींच्या गमतीशीर कथा ‘आलंय माझ्या राशीला’ या सिनेमात पहायला मिळणार आहे. अश्विनी आनंद पिंपळकर या चित्रपटाच्या निर्मात्या असून निर्मिती सावंत यांच्यासह मकरंद अनासपुरे, प्रशांत दामले, चिन्मय मांडलेकर, प्रसाद ओक आदी मराठीतील दिग्गज कलाकार या सिनेमात वेगवेगळ्या राशीचं प्रतिनिधीत्व करताना दिसणार आहेत. या सिनेमाचं शूटिंग लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या