'ब्रिंग इट ऑन बेबी'ची क्रेझ

मुंबई - 'सैराट' सिनेमाच्या गाण्यांनी प्रेक्षकांना चांगलंच झिंगायला लावलं. आजही झिंगाट गाणं लागलं कि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचेच पाय ह्या गाण्यावर थिरकतात. पण आता झिंगाटनंतर अजय अतुलचं एक नवं गाणं प्रेक्षकांना वेड लावतंय. 'जाऊं द्याना बाळासाहेब' या सिनेमातलं 'ब्रिंग इट ऑन बेबी' हे गाणं सध्या चांगलंच गाजतंय.

'जाऊं द्याना बाळासाहेब' या चित्रपटातून 'चला हवा येऊ द्या' फेम भाऊ कदम एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. सई ताम्हनकर, गिरीश कुलकर्णी आणि भाऊ कदम या तिघांवर हे गाणं चित्रित करण्यात आलंय.

अवघ्या काही दिवसांपूर्वीच या गाण्याचा पूर्ण व्हिडीओ लाँच करण्यात आला. अवघ्या ६ दिवसांच्या काळात या व्हिडीओला तब्बल अडीच लाखाहून जास्त हिट्स मिळाले आहेत. त्यामुळे झिंगाटनंतर ब्रिंग इट ऑन बेबी हे गाणंही प्रेक्षकांना ऑन करणार हे नक्की.

Loading Comments