Advertisement

नेहा कक्करचा चाहत्यांना सुखद धक्का

ही सेलिब्रिटी जोडी त्यांच्या विवाहसोहळ्यापासून ते अगदी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळं सतत चर्चेत येत असते.

नेहा कक्करचा चाहत्यांना सुखद धक्का
SHARES

बॉलिवूड गायिका नेहा कक्करने चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे. नेहा लवकरच आई होणार आहे. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर रोहनप्रीत सिंगसोबतचा एक रोमॅण्टिक फोटो शेअर केला आहे.फोटोमध्ये ती आपला बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे.

ही सेलिब्रिटी जोडी त्यांच्या विवाहसोहळ्यापासून ते अगदी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळं सतत चर्चेत येत असते. त्यांचं एखादं नवं गाण असो किंवा मग लव्हस्टोरी. नेहा आणि रोहनप्रीत मागील काही दिवसांपासून सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या सेलिब्रिटी जोड्यांपैकी एक आहेत. नेहा कक्करने तिच्या रिलेशनशिप आणि लग्नाप्रमाणेच आता प्रेग्नन्सीचीही बातमी लोकांना दिली आहे. नेहा आणि रोहनने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. त्यात नेहा प्रेग्नंट दिसत आहे. 

नेहा आणि रोहनप्रीत सिंह यांचा दोनच महिन्यांपूर्वी २४ ऑक्टोबरला विवाहसोहळा थाटामाटात पार पडला. त्यानंतर आता लगेच नेहाने गरोदर असल्याची बातमी दिली आहे. 

नेहाने बेबी बंपसोबत फोटो शेअर करत ‘खयाल रखा कर’, असं कॅप्शन दिलं आहे. तर तिच्या या फोटोवर रोहनप्रीतनेदेखील ‘आता तर आणखी जास्त काळजी घ्यावी लागेल’, अशी कमेंट केली आहे.  नेहाचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.हेही वाचा -

पहिले लसीकरण केंद्र कूपर रुग्णालयात

समुद्र पर्यटनाची मजा वाढणार, ‘बीच शॅक’ धोरणाला मंजुरीRead this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा