Advertisement

Sacred Games 2 : इस बार भगवान खुदको भी नहीं बचा सकता!

सेक्रेड गेम्स वेबसिरीजचा दुसरा सिझन कधी येतोय? याची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत होते. प्रेक्षकांची हीच प्रतिक्षा संपली असून सेक्रेड गेम्सचा दुसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नेटफ्लिक्सनं याचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे.

Sacred Games 2 : इस बार भगवान खुदको भी नहीं बचा सकता!
SHARES

बिच्छु हैं अपनी कहानी चिपक गयी है आपकोहा डायलॉग बोलणारा गणेश गायतोंडे सर्वांच्या नक्कीच लक्षात असेल. सेक्रेड गेम्समधील हा डायलॉग तंतोतंत सध्याच्या परिस्थितीशी जुळतोय. गणेश गायतोंडेच्या याच कहाणीनं प्रेक्षकांना याड लावलं. सेक्रेड गेम्स वेबसिरीजचा दुसरा सिझन कधी येतोय? याची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत होते. प्रेक्षकांची हीच प्रतिक्षा संपली असून सेक्रेड गेम्सचा दुसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नेटफ्लिक्सनं त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर सेक्रेड गेम्सच्या दुसऱ्या सिझनचा टिजर पोस्ट केला आहे


दमदार संवाद

"२५ दिवसात काय होणार? फक्त त्रिवेदी का वाचणार? अंडरग्राऊंड टनलमध्ये काय असतं?" अशा अनेक प्रश्नांची उत्तरं नव्या सिझनमध्ये मिळणार आहेत, अशी कमेंट नेटफ्लिक्सनं पोस्ट केली आहे. टिझर पोस्ट करत त्यांनी म्हटलं आहे की, "अजून वाईट घडणं बाकी आहे. सेक्रेड गेम्सचा दुसरा सिझन घेऊन येणार आहोत." टिझरमधील शेवटचा संवाद अंगावर काटा आणणारा आहे. 'तुम्हे लगता है भगवान बचा लेगा? इस बार भगवान खुदको भी नहीं बचा सकता!’ हा नवा डायलॉग प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवत आहे.



टिझर सुपरहिट

नेटफ्लिक्सनं टिझर पोस्ट करताच काही तासातच तो व्हायरल झाला. काही तासांमध्येच ५ हजाराच्यावर शेअर्स आणि १० हजाराच्या वर लाईक्स मिळाले आहेत. तर लाखो प्रेक्षकांनी हा टिझर पाहिला आहे. 





विक्रमादित्य मोटवानी आणि अनुराग कश्यप यांनी दिग्दर्शित केलेला पहिला सिझन प्रेक्षकांना आवडला आहे. आता दुसरा सिझन कसा असणार? याची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे. त्यातील काही संवाद ऐकल्यानंतर तर कधी ऐकदा सेक्रेड गेम्सचा दुसरा सिझन पाहतोय असं झालंय. सेक्रेड गेम्समध्ये सैफ अली खान, नवाजुद्दीन सिद्दीकी, राधिका आपटे, जितेंद्र जोशी, गिरीश कुलकर्णी, राजश्री देशपांडे, जतिन शर्मा, सुरवीन चावला, शालिनी वत्स, कुब्रा सेट, नीरज काबी यांच्या दमदार अभिनयाची झलक पहिल्या सिझनमध्ये पाहायला मिळाली. गणेश गायतोंडे, बंटी, दिलबाग सिंग, सरताज सिंग यांच्या भोवती फिरणारी ही कथा काय वळणं घेते हे पाहणं औत्सुक्याचं राहणार आहे.



हेही वाचा

म्हणून सलमानने 'लवरात्री' सिनेमाचं नाव 'लवयात्री' केलं!

इन्स्टावर श्रद्धा बनली लोकप्रिय ‘स्त्री’!


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement