बाहुबलीची मजा लुटताना सक्तीच्या जाहिराती

  Kurla
  बाहुबलीची मजा लुटताना सक्तीच्या जाहिराती
  मुंबई  -  

  चित्रपट 160 मिनिटांचा आणि त्यात जाहीरात 52 मिनिटांच्या आणि त्या देखील सक्तीच्या, हे ऐकून तुम्हालाही विचीत्र वाटले असेल. पण हे खरं आहे. कुर्ल्यातल्या पीव्हीआरमध्ये चित्रपट सुरू होण्यापूर्वी आणि मध्यंतराला एकूण 52 मिनिटांच्या सक्तीच्या जाहीराती दाखवण्यात आल्याचा आरोप जय हो संस्थेचे अध्यक्ष अफरोज मलिक यांनी केला आहे.

  अफरोज मलिक यांनी सेंन्सॉर बोर्डाला याबाबत पाठबलेल्या पत्रात म्हटले आहे की, ते 29 एप्रिलला रात्री 11.40 वाजता कुर्लातल्या पीवीआर फिनिक्स मॉलमध्ये बाहुबली सिनेमा पाहण्यासाठी गेले होते. चित्रपट रात्री 11.40 वाजता सुरू होणार होता. त्यासाठी ते रात्री 11.35 वाजताच सिनेमा हॉलमध्ये पोहचले होते. त्यांनी आरोप केला आहे की, सिनेमा 11.40 वाजता सुरू होण्याच्या आधी जाहिराती दाखवल्या जात होत्या आणि त्या 12.02 मिनिटांपर्यंत दाखवण्यात आल्या. चित्रपटाच्या मध्यांतराच्या दरम्यानही 20 मिनिटांच्या जाहिराती दाखवण्यात आल्या.

  मलिक यांचे म्हणणे आहे कि, जर त्यांनी चित्रपट पाहण्यासाठी 430 रुपयांचे तिकीट विकत घेतलं तर त्यात 52 मिनिटांच्या सक्तीच्या जाहिराती का दाखवल्या गेल्या? पीव्हीआरने कोणत्या आधारावर एवढ्या मोठ्या जाहीराती दाखवल्या, याची माहिती त्यांनी मागितली आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.