Advertisement

…आणि जॅकीनं केलं थुकरटवाडीच्या भिडूचं कौतुक!

थुकरटवाडीच्या कलाकारांनी आमिरच्या सुपरहिट ‘रंगीला’ चित्रपटाचं धमाल विनोदी स्कीट सादर केलं. यात भाऊ कदमनं आमिर, श्रेया बुगडेनं उर्मिला मातोंडकर, तर निलेश साबळेनं जॅकी श्रॉफ म्हणजेच भिडू साकारला होता. जॅकीच्या बोलण्यात भिडू हा शब्दप्रयोग कायम असतो. त्यामुळं त्यांना बऱ्याचदा भिडू या टोपणनावानंही संबोधलं जातं.

…आणि जॅकीनं केलं थुकरटवाडीच्या भिडूचं कौतुक!
SHARES

सुरुवातीला केवळ चित्रपटांच्या प्रमोशनसाठी सुरू झालेला ‘चला हवा येऊ द्या’ या शोनं आता जगभरातील मराठी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. आज अमराठी कलाकारांनाही या मंचावर येऊन मनसोक्त हसण्याचे वेध लागलेले असताना अभिनेता जॅकी श्रॉफनं ‘चला हवा येऊ द्या’मधील भिडूचं कौतुक केलं आहे.


होऊ दे व्हायरल

‘कसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे’, असं म्हणत मागील चार वर्षे झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम महाराष्ट्रासोबतच जगभरातीलमराठी प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. आतापर्यंतच्या प्रवासात या शोमध्ये प्रेक्षकांनी महाराष्ट्र दौरा, भारत दौरा आणि विश्व दौरा यांचा मनमुराद आनंद लुटला. त्यानंतर या कार्यक्रमातील ‘होऊ दे व्हायरल’ हे पर्वही खूप गाजलं. इतकंच काय आता लवकरच 'चला हवा येऊ द्या'चं सिलेब्रिटी पर्व प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.


पाणी संवर्धनावर स्किट

मागील आठवड्यात प्रसारित झालेल्या ‘चला हवा येऊ द्या’च्या भागात अभिनेता आमिर खाननं पत्नी किरण रावसह हजेरी लावली होती. त्यांच्या उपस्थितीत थुकरटवाडीतील विनोदवीरांनी एकच कल्ला केला. आमिर आणि किरण यांनी पाणी संवर्धनावर प्रेक्षकांसाठी एक स्किट केलं, तर थुकरटवाडीच्या कलाकारांनी आमिरच्या सुपरहिट ‘रंगीला’ चित्रपटाचं धमाल विनोदी स्कीट सादर केलं. यात भाऊ कदमनं आमिर, श्रेया बुगडेनं उर्मिला मातोंडकर, तर निलेश साबळेनं जॅकी श्रॉफ म्हणजेच भिडू साकारला होता. जॅकीच्या बोलण्यात भिडू हा शब्दप्रयोग कायम असतो. त्यामुळं त्यांना बऱ्याचदा भिडू या टोपणनावानंही संबोधलं जातं.


जॅकीकडून प्रशंसा

या स्किटनंतर आमिरनं सर्व विनोदवीरांचं खूप कौतुक केलं. खुद्द जॅकीनं त्यांचं हे स्किट पाहून निलेशच्या परफॉर्मन्सला दाद दिली. जॅकीनं फोनवरून निलेशची प्रशंसा केली. हे स्किट ‘लय भारी’ झाल्याचंही जॅकी म्हणाले.हेही वाचा -

'टकाटक' भूमिकेत प्रथमेश परब

बायको शोधणाऱ्या नवरदेवाची झलक पाहिली का?
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा