Advertisement

भिंतीवर इरफान खानचे पेंटिंग बघून भावूक झाली 'लंचबॉक्स' फेम अभिनेत्री

बॉलिवूड आर्ट प्रोजेक्टचे कलाकार रंजीत दाहिया यांनी एका घराबाहेरील भिंतीवर इरफानचे म्युरल आर्ट बनवलं आहे.

भिंतीवर इरफान खानचे पेंटिंग बघून भावूक झाली 'लंचबॉक्स' फेम अभिनेत्री
SHARES

अभिनेता इरफान खानचं गेल्या महिन्यात २९ एप्रिल रोजी निधन झालं होतं. त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी बॉलिवूड आर्ट प्रोजेक्टचे कलाकार रंजीत दाहिया यांनी एका घराबाहेरील भिंतीवर त्याचे म्युरल आर्ट बनवलं आहे.

या म्युरल आर्टचे छायाचित्र लंचबॉक्स या चित्रपटात त्याच्यासोबत काम केलेल्या अभिनेत्री निमरत कौर हिनं तिच्या ट्विटर हँडल अकाऊंटवर शेअर केलं आणि लिहिलं की, कुणी विचार केला होता, जीवन आणि कलेचा असा अशुभ आणि आतापर्यंत साजरा केलेला संगम...

'लंचबॉक्स'मध्ये एकत्र काम

निमरतनं छायाचित्र शेअर करुन लिहिलं की, लंचबॉक्स या चित्रपटात इरफान खाननं साकारलेलं पात्र साजन फर्नांडिजचं घर इथूनच काही अंतरावर आहे. हे घर वरोडा रोल वांद्रा वेस्टस्थित रनवार गावात आहे. यापूर्वी या भिंतीवर मांझी या चित्रपटातील नवाजुद्दीन सिद्धीकीच्या पात्राचं म्युरल आर्ट बनवण्यात आलं होतं.कलाकारांनी शेअर केले व्हिडिओ

हे आर्ट वर्क बनवतानाचे अनेक व्हिडिओ रंजीत दाहिया आणि विकास बन्सल यांनी आपल्या इंस्टाग्राम पेजवर शेअर केले आहेत.हेही वाचा

'तारक मेहता का उल्टा चष्मा' पाहूून खुष झाला आयसीयूतला पेशंट

'अशा'प्रकारे उर्वशीची कोरोना विरुद्ध लढ्यासाठी मदत

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा