Advertisement

‘बिग बॅास’मध्ये कोण होणार नॅामिनेट?

नवीन आठवडा सुरु झाला आहे. घरातील सदस्यांना बिग बॉस नक्कीच साप्ताहिक कार्य, कॅप्टनसीचे कार्य आणि बरेच नवे टास्क देणार आहेत. तेव्हा या आठवड्यामध्ये कोण घराबाहेर जाणार? कोण बनणार नवा कॅप्टन? कोण कोणाला नॉमिनेट करणार? हे पाहायला मिळेल.

‘बिग बॅास’मध्ये कोण होणार नॅामिनेट?
SHARES

कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस’ मराठीच्या घरामधून काल त्यागराज खाडिलकर घराबाहेर पडले. भूषण, रेशम आणि त्यागराज डेंजर झोन मध्ये होते. ज्यामध्ये त्यागराज यांना कमी मत मिळाले. त्यामुळे ते घराबाहेर गेले. घरातून बाहेर गेल्यावर त्यागराज यांनी घरच्यांना काही गैरसमज असतील ते घरच्यांनी मनामध्ये ठेऊ नका असं देखील सांगितलं. आता नवीन आठवडा सुरु झाला आहे. घरातील सदस्यांना बिग बॉस नक्कीच साप्ताहिक कार्य, कॅप्टनसीचे कार्य आणि बरेच नवे टास्क देणार आहेत. तेव्हा या आठवड्यामध्ये कोण घराबाहेर जाणार? कोण बनणार नवा कॅप्टन? कोण कोणाला नॉमिनेट करणार? हे पाहायला मिळेल.परदर्शक प्रक्रिया

बिग बॉसच्या घरामध्ये सोमवारी नॉमिनेशन प्रक्रिया पार पडणार आहे. नॉमिनेशन प्रक्रिया सर्व सदस्यांसमोर पार पडेल असं बिग बॉस घोषित करणार आहे. हा खेळ वैयक्तिकरीत्या कसा खेळायचा हे प्रत्येक सदस्यावर अवलंबून आहे. बिग बॉसच्या घरामध्ये काही अपात्र सदस्य असतील ज्यांना अजूनही हा खेळ खेळता येत नाही अथवा हा खेळ समजण्या इतपत बौद्धिक पातळी नाही, म्हणूनच नॉमिनेशन प्रक्रिया सर्वांसमोर उघडपणे पार पाडली जाणार आहे, असं बिग बॉस यांनी सदस्यांना सांगितलं आहे.


२ जणांना नाॅमिनेट करायचं

या नॉमिनेशन प्रक्रियेमध्ये घरातील प्रत्येक सदस्याला २ सदस्यांना नॉमिनेट करायचं आहे. ज्या सदस्याला नॉमिनेट करायचं आहे. त्याच्या चेहऱ्याला पावडर फासणं अनिवार्य असणार आहे. तेव्हा कोण कोणाला नॉमिनेट करणार? कोण घराबाहेर जाणार? हे बघणं रंजक ठरणार आहे.हेही वाचा-

सुबोध, श्रुतीची पुन्हा जमली जोडी!संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा