Advertisement

‘नृत्य-सजीव गीतरामायणा’ने रसिकांना घातली मोहिनी


‘नृत्य-सजीव गीतरामायणा’ने रसिकांना घातली मोहिनी
SHARES

ग. दि. माडगूळकर उर्फ गदिमा यांच्या सिद्धहस्त लेखणीतून अवतरलेल्या तसेच संगीतकार सुधीर फडके म्हणजेच सर्वांचे लाडके बाबूजी यांच्या प्रतिभा संगमातून अवतरलेल्या ‘स्वये श्री रामप्रभू ऐकती...’, ‘राम जन्मला ग सखे राम जन्मला...’, ‘शरयू तीरावरी अयोध्या...’, ‘स्वयंवर झाले सीतेचे...’ यांसारख्या गीत रामायणाच्या रचनांनी पुन्हा एकदा रसिकांचे कान तृप्त केले. सुबक यांची निर्मिती असलेलं ‘नृत्य-सजीव गीत रामायण’हा कार्यक्रम नुकताच षण्मुखानंद सभागृहात पार पडला.



निर्माते रमेश देव आणि सुनील बर्वे यांची निर्मिती असलेल्या ‘नृत्य-सजीव गीत रामायण’मध्ये गदिमांनी रचलेल्या रचना नृत्य, गीत आणि संगीत यांचा अचूक मिलाफ घडवत सादर करण्यात आल्या. 'यापूर्वी सुबकच्या माध्यमातून काळाच्या पडद्याआड गेलेल्या नाटकांना पुनरुज्जीवित केल्यानंतर गदिमा-बाबूजींचं 'गीत रामायण' रंगभूमीवर आणणं हा धाडसी निर्णय होता,' असं मत सुनील बर्वे यांनी व्यक्त केलं.




डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा