ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी अनंतात विलीन

Pali Hill
ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी अनंतात विलीन
ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी अनंतात विलीन
ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी अनंतात विलीन
ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी अनंतात विलीन
See all
मुंबई  -  

मुंबई - प्रसिद्ध अभिनेता अोम पुरी यांच्या पार्थिवावर शुक्रवारी संध्याकाळी 6.45 च्या सुमारास ओशिवरा येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. शुक्रवारी सकाळी त्यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्यांच्या मुलानेच मुखाग्नी दिला. त्यांना शेवटचं डोळे भरून पाहण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. संध्याकाळी 6 वाजता त्यांचं पार्थिव त्यांच्या अंधेरी इथल्या राहत्या घरी आणण्यात आले. यावेळी ओम पूरी यांच्यापासून वेगळी राहत असलेली पत्नी नंदीता, मुलगा इशान उपस्थित होते. अभिनेते शशी कपूर, अमिताभ बच्चन,अभिषेक बच्चन, जावेद अख्तर, शबाना आजमी, इरफान,  गुलजार, शक्ति कपूर, प्रकाश झा, सतीश कौशिक, रणवीर शौरी, अभिषेक चौबे, राहुल ढोलकिया, मनोज बाजपेयी, केतन मेहता, नवाजुद्दीन सिद्दीकी, पंकज कपूर, रमेश सिप्पी, श्याम बेनेगल, सुधीर मिश्रा, पीयूष मिश्रा यांच्यासारखे अनेक कलाकारांनी यावेळी हजेरी लावली होती. अनिल कपूर, कबिर खान, सुप्रिया पाठक, जॉनी लीवर, आलोक नाथ, रत्ना पाठक शाह, विवान शाह, इला अरूण, कंवलजीत सिंह, फरहान अख्तर आणि सोनू सूद यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.