Advertisement

‘ओन्ली फोर्टी’ – महेश मांजरेकरांचा नवा फंडा


SHARES
Advertisement

मुंबई - मराठी चित्रपटसृष्टीला सध्या फटका बसला आहे तो चित्रपटांच्या भरमसाठ संख्येचा. सध्या दरवर्षी आपल्याकडे शंभराहून अधिक चित्रपट बनताहेत. आपल्याकडील यशाची टक्केवारी अवघी 4 ते 5 टक्के आहे. निःश्चलीकरणामुळे भविष्यात मराठी चित्रपटांची संख्या निश्चितच कमी होईल. मात्र हा आकडा 40पेक्षा अधिक असता कामा नये, असं ठाम मत प्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी ‘हॅंगआऊट विथ’ या शोमध्ये व्यक्त केलं. यावेळी त्यांनी गोव्यात नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी चित्रपटांची कामगिरी याबद्दल भाष्य केलं. तसेच ‘ध्यानीमनी’, ‘रुबिक्स क्यूब’, ‘एफयू’ या आपल्या आगामी चित्रपटांबद्दलही मनमोकळी चर्चा केली.

संबंधित विषय
Advertisement