ऑपेरा हाउसला पुन्हा रॉयल झळाळी...

  मुंबई  -  

  गिरगाव - ऑपेरा हाउस. बस नामही काफी है. पृथ्वीराज कपूर ते लतादीदींपर्यंत दिग्गजांच्या कलांचा आस्वाद रसिकांनी घेतला ती वास्तू म्हणजे रॉयल ऑपेरा हाउस. मुंबईच्या इतिहासातला हा एक महत्त्वाचा सांस्कृतिक ठेवा, आता तो पुन्हा झळाळू लागलाय...

  सिनेमा, संस्कृती आणि कलेच्या वारशाशी जोडलेली ही वास्तू 23 वर्षांनंतर रसिकांच्या सेवेत पुन्हा दाखल झालीये. निमित्त झालाय ‘मामि’ महोत्सव. 23 वर्षांपूर्वी प्रसिद्धीच्या झोतातल्या रॉयल ऑपेरा हाउसच्या नशिबी उपेक्षेचा अंधार आला. बरीच वर्षं इथे काहीच कार्यक्रम होत नव्हते. या अंधारातून ही वास्तू पुन्हा बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले साधारण 8 वर्षांपूर्वी आणि आता पुन्हा एकदा ती झगमगू लागलीये. ऑपेरा हाउसचा हा कायापालट पाहण्यासाठी सर्वसामान्यच नाही तर कलाकारांचीही गर्दी झाली होती. रॉयल ऑपेरा हाउसच्या गतवैभवाचे अनेक साक्षीदार आजही असतील. या वास्तूला पुन्हा मिळालेली झळाळी पाहून त्यांचे चेहरे कदाचित या वास्तूपेक्षाही जास्त उजळून निघतील. 

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.