पंडित उमा डोग्रांनी दिले कथ्थकचे धडे

नरिमन पॉइंट - सुमित नागदेव अकादमीला 10 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कथ्थक विशारद असलेल्या पंडित उमा डोग्रा यांनी विद्यार्थ्यांना कथ्थक नृत्याचे धडे दिले. नॅशनल थिएटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स अर्थात ‘एनसीपीए’च्या वेस्ट व्ह्यू रूमच्या हॉलमध्ये कथ्थक नृत्याच्या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं.

सुमित नागदेव अकादमीच्या या कार्यशाळेत विद्यार्थ्यांसह पालकांनीही कथ्थकचे धडे घेतले. या वेळी कथ्थक नृत्यामध्ये किती प्रकार असतात. या नृत्यात हाव-भाव किती महत्त्वाचे असतात यासंदर्भात त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. पंडित उमा डोग्रा यांनी नृत्याविषयी माहिती तर दिलीच शिवाय काही नृत्य प्रकार करूनही दाखवले.

Loading Comments