'फिलौरी'ची कॉपीराईटच्या कचाट्यातून अखेर सुटका

 Mumbai
'फिलौरी'ची कॉपीराईटच्या कचाट्यातून अखेर सुटका
Mumbai  -  

मुंबई - अभिनेत्री अनुष्का शर्माच्या फिलौरी या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या चित्रपटाविरोधात दाखल करण्यात आलेली कॉपीराईटची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. एवढंच नव्हे तर न्यायालयाचा वेळ वाया घालवल्याबद्दल याचिकाकर्त्यांना पाच लाख रुपयांचा दंड देखील ठोठावण्यात आला आहे.

2013 साली प्रदर्शित झालेला गुजराती चित्रपट 'मंगल फेरा'च्या निर्मात्यांनी फिलौरी चित्रपटात त्यांची स्क्रिप्ट कॉपी केल्याचा दावा करत न्यायालयात धाव घेतली होती. याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी या सिनेमाचे प्रदर्शन थांबवण्याची मागणी केली होती. मात्र चित्रपट प्रदर्शनाच्या एवढ्या जवळ असताना न्यायालय अशी कारवाई करू शकत नसल्याचं सांगत उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांची मागणी फेटाळली.

मंगल फेरा या चित्रपटाची कथा ही एका महिलेच्या भोवती फिरते जी मांगलिक असते. या प्रकरणी मंगल फेराच्या निर्मात्यांनी फिलौरीच्या निर्मात्यांना नोटीस पाठवली होती, मात्र मिळालेल्या उत्तराने त्यांचं समाधान न झाल्याने त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

Loading Comments