प्रभू देवाला अर्धांगवायूचा झटका

  Pali Hill
  प्रभू देवाला अर्धांगवायूचा झटका
  मुंबई  -  

  मुंबई - सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक प्रभू देवा याला अर्धांगवायूचा झटका आला आहे. गेल्या आठवड्यात एका चित्रपटाचे चित्रीकरण करताना ही घटना घडली. प्रभू देवा आपल्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण करत होता. त्यादरम्यान त्याच्या पाठीत वेदना जाणवू लागल्या आणि तो जमिनीवर कोसळला. त्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. अधिक तपासणीनंतर डॉक्टरांनी स्नायू अधिक ताणले गेल्याने अर्धांगवायूचा झटका आल्याचे सांगितले. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत प्रभूदेवाच्या डान्स अकादमीची चर्चा होती. ही अकादमी लवकरच सुरुही होणार होती. या अपघातामुळे अकादमीचे हे उद्घाटन लांबण्याची शक्यता आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.