'गणपती' मंडळांचे की 'पक्षाचे' - संतोष जुवेकर

Mumbai
'गणपती' मंडळांचे की 'पक्षाचे' - संतोष जुवेकर
'गणपती' मंडळांचे की 'पक्षाचे' - संतोष जुवेकर
'गणपती' मंडळांचे की 'पक्षाचे' - संतोष जुवेकर
See all
मुंबई  -  

सगळ्यांनाच वेध लावणारा सण म्हणजे गणेशोत्सव. बाप्पाची स्थापना करणे त्याची मनोभावे सेवा करणे हे कुणाला आवडणार नाही? मग या सगळ्यात कलाकार मंडळी तरी कसे मागे राहतील?. अभिनेता संतोष जुवेकरच्या घरी दरवर्षीप्रमाणे यंदाही गणपतीची स्थापना झाली आहे. गणेशोत्सव हा त्याचाही आवडता सण आहे. कारण एकीकडे बाप्पासाठी असलेले श्रद्धास्थान आणि दुसरे म्हणजे भरपूर खायला मिळणारे मोदक. त्याला फक्त घरी बनवलेले आणि उकडीचेच मोदक आवडतात. इतकेच नाही तर त्याला ते बनवताही येतात. यंदा शूटिंगच्या बिझी शेड्युलमधून वेळ काढून संतोष घरी राहतो आणि आईला मोदक तयार करण्यासाठी आवर्जून मदतही करतो.

आजही संतोष त्याच्या जुन्या गणपती सणाच्या आठवणी सांगताना थकत नाही. रात्रभर जागून गणपतीसाठी डेकोरेशन करणे, मध्यरात्री चहा आणि वडापाव खाणे तसेच वर्गणी मागत सगळ्यांच्या घरी फिरणे बाप्पा आल्यावर मंडळातच दिवस रात्र राहणे. सगळ्यांच्या घरी आरतीला जाण हे सगळं तो आजही तेवढाच मिस करतो.
पण आताच्या गणेशउत्सवाला जे रूप आले आहे ते खरेच काळजी करण्यासारखंच आहे असे त्याचे मत आहे. आधी पूर्ण चाळीचा एक गणपती असायचा. पण आता सोसायचीमध्ये ६ बिल्डिंग असतात आणि प्रत्येकाचा वेगवेगळा गणपती बसतो. आता उत्सव नाही स्पर्धा झाली आहे आणि गणपती मंडळाचा नाही तर पक्षाचा वाटू लागलाय. गणपतीला मंडळाच्या नावाने नाही तर एखाद्या नेत्याच्या नावाने जास्त ओळखू लागलेत लोक आणि ही गोष्ट खरंच त्रास देते असेही तो म्हणतो.
हे सगळं सांगत असताना संतोष काही तरुणांचे कौतुक करायलाही विसरला नाही. आधी ढोल पथक फक्त पुण्याला, नाशिकला पाहायला मिळायचे. पण आता मुंबईतल्या बऱ्याच तरुणमंडळीही सगळ्यात भाग घेताना दिसत आहेत. त्याचा अभिमान वाटतो. तसेच गणपती समोर शीला की जवानी गाणे लावणाऱ्यांनी या तरुणांकडून काहीतरी शिकायला हवे. असेही तो म्हणाला. 

 

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.