जियाच्या आईची एसआयटीची मागणी न्यायालयाने फेटाळली

  Mumbai
  जियाच्या आईची एसआयटीची मागणी न्यायालयाने फेटाळली
  मुंबई  -  

  मुंबई - अभिनेत्री जिया खानच्या मृत्यूप्रकरणी एसआयटीची मागणी करणाऱ्या जियाच्या आईला मोठा झटका बसला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने जियाच्या आईची मागणी फेटाळली आहे.

  जिया खानच्या मृत्यूबाबत केंद्रीय गुन्हे अन्वेक्षण विभागाने सुरज पांचोली विरोधात जियाला आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा ठपका ठेवत आरोपपत्र दाखल केलं होतं, मात्र ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा करत जियाच्या आईने एसआयटीची मागणी करत उच्च न्यायालयाच्या निरीक्षणाखाली तपास करण्याची मागणी केली होती. दरम्यान, राबियाच्या मागणीला सीबीआयने विरोध केला होता. आम्ही प्रत्येक दृष्टीकोनातून या प्रकाराचा तपास केला असून त्यानंतरच आम्ही ही हत्या नसून आत्महत्यांच्या निष्कर्षावर आल्याचं या वेळी सीबीआयकडून कोर्टात सांगण्यात आलं. या वेळी "मी उच्च न्यायालयाच्या आदेशाची ( detailed copy ) वाट बघेन आणि त्यानंतर मी या विरोधात अपील करेन, माझा अजून देवावरून विश्वास उठलेला नाहीय" अशी प्रतिक्रिया राबिया खान यांनी दिली, त्या सध्या लंडनला आहेत.

  3 जून 2013 ला जियाचा मृत्यू झाला होता. जियाने आत्महत्या केल्याचं सीबीआयचं म्हणणं होत, तर तिने आत्महत्या केली नसून तिचा खून झाल्याचं राबियाने म्हटलं होतं. जियाच्या मृत्यूनंतर 10 जून 2013 ला जियाला आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या आरोपाखाली जुहू पोलिसांनी सुरज पांचोलीला अटक केली होती. ज्याला 2 जुलैला उच्च न्यायालयाने जमीन मंजूर केला होता. पोलीस योग्य प्रकारे तपास करत नसल्याचा दावा राबियाने केल्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं होतं.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.