'रईस'च्या अडचणी कायम

 Pali Hill
'रईस'च्या अडचणी कायम
Pali Hill, Mumbai  -  

मुंबई - अखेर किंग खान शाहरुखच्या रईस या सिनेमाला मुहूर्त मिळालाय. हा सिनेमा आता 25 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. पण शाहरुख खान आणि माहिरा यांच्या अडचणी अजूनही कमी होताना दिसत नाही. कारण माहिरा ही पाकिस्तानी अभिनेत्री असल्याने हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही अशा धमकीचा मेसेज वितरक (फिल्म डिस्ट्रीब्युटर) अक्षय राठी यांना आला होता. ही धमकी छत्तीसगढच्या युवासेनेकडून दिली जात असल्याची माहिती राठी यांनी ट्वीट करून उघडकीस आणली. मात्र यासंदर्भात त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली नसली तरी याची माहिती युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांना दिली आहे.

Loading Comments