Advertisement

बॉलिवूडनंतर आता क्रिकेटच्या मैदानातही उतरेल 'ही' जोडी

आता त्यांची क्रिकेटमधील आवड इतकी वाढली आहे की, ते क्रिकेटच्या मैदानात उतरणार आहेत अशी चर्चा आहे.

बॉलिवूडनंतर आता क्रिकेटच्या मैदानातही उतरेल 'ही' जोडी
SHARES

बॉलिवूडमधील सर्वातप्रिय जोडप्यांपैकी एक दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग आता खेळाकडे पाऊल टाकत आहेत. हे जोडपे क्रिकेटवर आधारित ८३ चित्रपटात दिसणार आहे. आता त्यांची क्रिकेटमधील आवड इतकी वाढली आहे की, ते आयपीएल २०२२ मध्ये आपल्या संघाला मैदानात उतरवण्यास तयार आहेत.

मीडियाच्या ताज्या बातम्यांनुसार, रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण आयपीएल २०२२ साठी आयपीएल टीम खरेदी करणार आहेत.

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांची पुढच्या वर्षीच्या आयपीएलमध्ये टीम असेल, असं बोललं जातंय. मात्र, या जोडप्यानं यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. याआधी शाहरुख खान, प्रीती झिंटी, जुही चावला, शिल्पा शेट्टी मालकीच्या टीम आहेत. त्यांच्याकडे आयपीएल फ्रेंचायजी आहेत.

रणवीर आणि दीपिका आयपीएलमध्ये आपली टीम बनवणार असल्याची बातमी येताच अनुभवी खेळाडू दिनेश कार्तिकनं विनोद केला. त्यानं ट्विट करून लिहिलं- त्या टीमची जर्सी मजेदार असेल. खरं तर, रणवीर सिंह नेहमीच त्याच्या विचित्र ड्रेसिंग सेन्ससाठी ओळखला जातो आणि कार्तिकनेही यावर विनोद केला.


हेही वाचा

असं काय झालं की जान्हवीनं बोनी कपूरना सगळ्यांसमोर खडसावलं?

जगभरात धुमाकूळ घालणारा बाहुबली लवकरच मराठीत

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा