Advertisement

असं काय झालं की जान्हवीनं बोनी कपूरना सगळ्यांसमोर खडसावलं?

एका कारणास्तव जान्हवी कपूरनं आपल्या वडिलांना चांगलंच खडसावलं.

असं काय झालं की जान्हवीनं बोनी कपूरना सगळ्यांसमोर खडसावलं?
SHARES

बोनी कपूर आणि जान्हवी कपूर या दोघांना मुंबईतील एअरपोर्टवर नुकतंच स्पॉट करण्यात आलं होतं. यावेळी एका कारणास्तव जान्हवी कपूरनं आपल्या वडिलांना चांगलंच खडसावलं. यावेळी तिकडे फोटोग्राफर्स देखील हजर होते. वडिलांना खडसावतानाचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

झालं असं की, एअरपोर्टच्या बाहेर जान्हवी आणि बोनी कपूर दिसताच फोटोग्राफर्स आणि चाहत्यांचा गराडा पडला. सर्व फोटोग्राफरनी फोटो काढण्यासाठी Boney Kapoor यांना मास्क खाली करण्यास सांगितलं. फोटोग्राफर्सचं ऐकत बोनी कपूर यांनी मास्क काढलंच होतं.

पण जान्हवीनं हे बघताच तिनं बोनी कपूर यांना खडसावलं ' नही नही पापा मास्क नीचे मत करो' असं बोलून चांगलंच सुनावलं. लेकिचं ऐकून बोनी कपूर यांनीही मास्क पुन्हा लावला. तरीही फोटोग्राफर्सचा आग्रह सुरू होता, इतकं काही होत नाही, काही सेकंदासाठी करा तुम्ही मास्क खाली. त्यावर जान्हवी भडकली आणि फोटोग्राफर्सनाही तिनं सुनावलं.'उन्हे गलत सलाह मत दो' असं बोलून दोघं तिथून निघून गेले.

जान्हवी कपूरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती सध्या गुड लक जैरी आणि दोस्ताना 2 साठीच्या चित्रपटांच्या तयारीत आहे. त्यातील गुडलक जैरी हा सिनेमा २०१८ मध्ये रिलीज झालेल्या पाश्चिमात्य सिनेमा Kolamavu Kokila याचा रिमेक आहे.



हेही वाचा

जगभरात धुमाकूळ घालणारा बाहुबली लवकरच मराठीत

ओ माय गॉड! चित्रपटाच्या सेटवर क्रू मेंबर कोविड पॉझिटिव्ह

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा