Advertisement

२०१९ मध्ये प्रदर्शित झाल्यात या '५' वेबसिरीज, २०२० मध्ये पाहिल्याच पाहिजेत

५ वेबसिरीज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्या २०२० मध्ये तुम्ही पाहिल्याच पाहिजे. या वेबसिरीज २०१९ मध्ये प्रदर्शित झाल्या.

२०१९ मध्ये प्रदर्शित झाल्यात या '५' वेबसिरीज, २०२० मध्ये पाहिल्याच पाहिजेत
SHARES

२०२० या वर्षात आपलं आगमन झालं आहे. २०१९ हे वर्ष वेबसिरीजसाठी चांगलं ठरलं. २०१९ या सरत्या वर्षात बऱ्याचा चांगल्या वेबसिरीज प्रदर्शित झाल्या. यापैकी काही वेबसिरीजनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. सेग्रेड गेम्स २ सारख्या वेबसिरीज प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या. पण त्यानंतर अशा बऱ्याच वेबसिरीज आल्या ज्यांना सेग्रेड गेम्स इतकी प्रसिद्धी मिळाली नाही. अशाच ५ वेबसिरीज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्या २०२० मध्ये तुम्ही पाहिल्याच पाहिजे. या वेबसिरीज २०१९ मध्ये प्रदर्शित झाल्या. पण या वेबसिरीजचा दुसरा भाग २०२० मध्ये येऊ शकतो


) फॅमिली मॅन : अॅमेझॉन प्राईम

प्राइम व्हिडीओची 'द फॅमिली मॅन' ही वेबसिरीज देशासह परदेशातही चांगली प्रसिद्ध झाली आहे. राज निदीमोरू आणि कृष्णा डीके यांनी या वेबसिरीजचे दिग्दर्शन केलेलं आहे. मनोज वाजपायी श्रीकांत तिवारीची भूमिका साकारात आहे. श्रीकांत हा एक गुप्त हेर असतो. श्रीकांतवर देशाच्या सुरक्षेची जबाबदारी असतेच


पण यासोबतच त्याच्या फॅमेलिची जबाबदारी देखील असते. या दोन्हा गोष्टी तो कशा हाताळतो हे तुम्हाला पाहता येणार आहे. या वेबसिरीजच्या पुढच्या भागाचं चित्रीकरण सुरू झाले आहे. दुसरा सीझन २०२० मध्ये प्रदर्शित होऊ शकतो


) लैला : नेटफ्लिक्स

धर्म, जाती यावर आधारित लैला या वेबसिरीजचे कथानक भयंकर आहे. आर्यवत या समाजावर ही वेबसिरीज असून 2047 मध्ये संपूर्ण देशावर या समाजाचे राज्य असल्याचे दाखवले आहे. या वेबसिरीजमध्ये हुमा कुरेशी ही मुख्य भूमिकेत आहे.


) बार्ड ऑफ ब्लड : नेटफ्लिक्स

शाहरुख खानच्या रेड चिलीजची ही पहली वेबसिरीज आहे. शाहरुख खाननं स्वतं: या वेबसिरीजचे प्रमोशन केलं होतं. या वेबसिरीजची चर्चा बरीच झाली होती. मात्र प्रेक्षकांकडून त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही

नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या या वेबसिरीजमध्ये इमरान हाश्मी, शोभिता धुलिपाला, कीर्ती कुल्हरी, विनीत कुमार सिंह, जयदीप अहलावात, दानिश हुसैन, रजित कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत. अंडर कव्हर एजंटवर ही कथा आधारीत आहे



) क्रिमिनल जस्टिस : हॉटस्टार

हॉटस्टारच्या 'क्रिमिनल जस्टिस’ या वेबसीरीज मध्ये विक्रांत मस्से, अनुप्रिया गोएंका, पंकज त्रिपाठी, मीता वशिष्ठ आणि जॅकी श्रॉफ यांच्या मुख्य भूमिका आहेत. तिग्मांशु धूलिया, विशाल फूरिया यांनी या वेबसिरीजचे दिग्दर्शन केलं आहे.

इंग्लंडमधल्या 'क्रिमिनल जस्टीस' या मालिकेची ही वेबसिरीज रिमेक आहे. थ्रिलर पाहायला आवडत असेल तर ही वेबसिरीज नक्की पाहा


) कोटा फॅक्ट्री - टीवीएफ

'कोटा फॅक्ट्री' ही वेबसिरीजमध्ये राजस्थानमधील कोटा या भागात शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांची गोष्ट दाखवण्यात आली आहे. या वेबसिरीज मध्ये मयूर मोरे, जितेंद्र कुमार आणि दीपक सिमवाल यांची मुख्य भूमिका आहे

राघव सुब्बू यांनी या वेबसिरीजचं दिग्दर्शन केलं आहे. कोटा फॅक्ट्री ही भारतातील पहिली ब्लॅक अॅण्ड व्हाईट वेबसिरीज आहे




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा