Advertisement

'सलमान खानच्या 'टायगर जिंदा है'चा प्रदर्शनापूर्वीच विक्रम! 'पद्मावती'लाही टाकलं मागे!


'सलमान खानच्या 'टायगर जिंदा है'चा प्रदर्शनापूर्वीच विक्रम! 'पद्मावती'लाही टाकलं मागे!
SHARES

बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्या लवकरच प्रदर्शित होणाऱ्या 'टायगर जिंदा है' सिनेमाची प्रेक्षक खूप आतुरतेने वाट बघतायत यात शंका नाही. 'टायगर जिंदा है' सिनेमाचा ट्रेलर जसा लॉन्च करण्यात आला, तसा तो सोशल मीडियावर पहिल्या क्रमांकावर ट्रेंड होऊ लागला. ट्रेलर प्रदर्शित झाल्याच्या अवघ्या २४ तासांमध्ये या ट्रेलरला 29 मिलियनप्रेक्षा ही जास्त व्यूज मिळाले होते. फेसबुक आणि युट्युबचे मिळून या सिनेमाला 29 मिलियन व्यूज मिळाले आहेत. जो एक मोठा विक्रम आहे. मेकर्सच म्हणणं आहे, की 'टायगर जिंदा है' या सिनेमाच्या ट्रेलरने आत्तापर्यँतच्या सगळ्या सिनेमांच्या ट्रेलरचे रेकॉर्ड तोडले आहेत.



'टायगर जिंदा है'चा ट्रेलर धमाकेदार अॅक्शनने भरलेला आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित २०१२मध्ये रिलीज झालेला 'एक था टायगर'चा 'टायगर जिंदा है' हा सिक्वेल आहे. 'एक था टायगर' या सिनेमाचं डिरेक्शन कबीर खान यांनी केलं होतं, तर 'टाइगर जिंदा है'च्या दिग्दर्शनाची जबाबदारी सलमान खानचा सुपर हिट सिनेमा 'सुलतान'चे डायरेक्टर अली अब्बास जफर यांनी सांभाळली आहे. डायरेक्टर बरोबरच अब्बास जफर यांनी सिनेमाची कथाही लिहिली आहे.



डिसेंबरमध्ये दोन मोठे सिनेमे प्रेक्षकांसमोर दाखल होणार आहेत. एक 'टायगर जिंदा है' आणि दुसरा 'पद्मावती'! गेल्या महिन्यात 'पद्मावती' सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांसमोर आला होता. दीपिका पादुकोण, रणवीर सिंग आणि शाहिद कपूर असलेल्या 'पद्मावती' या सिनेमाच्या ट्रेलरला २४ तासात १५ मिलियन व्यूज मिळाले होते आणि तिथेच सलमान खानच्या 'टायगर' जिंदा है' या सिनेमाच्या ट्रेलरला त्यापेक्षा दुप्पट व्यूज मिळले आहेत. त्यामुळे 'टायगर जिंदा है'ने 'पद्मावती'ला ही मागे टाकलं आहे. आता डिसेंबरनंतर कोणता सिनेमा कोणाला मागे टाकतो? ते कळेलच!



हेही वाचा

'पद्मावती'त 'तो' सीनच नाही, भन्साळी यांनी सोडलं मौन!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा