विकी कौशलसोबत रिंकूला जायचंय डेटवर!

'कागर'ची टिम सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या निमित्त ते विविध ठिकाणांना तसंच कार्यक्रमांनाही हजेरी लावत आहेत. हाच धागा पकडत 'कागर'ची टिम कलर्स मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या 'एकदम कडक' या कार्यक्रमात पोहोचली. इथंच रिंकूच्या मनातील गुपित ओठांवर आलं.

  • विकी कौशलसोबत रिंकूला जायचंय डेटवर!
SHARE

'सैराट' या चित्रपटाच्या यशामुळं अल्पावधीत प्रकाशझोतात आलेल्या रिंकू राजगुरूचा 'कागर' हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. या चित्रपटात ती सुनील तावडे यांचा मुलगा शुभंकरसोबत मुख्य भूमिकेत दिसणार असली तरी वास्तवात मात्र रिंकूला विकी कौशलसोबत डेटवर जायचं आहे.


मनातील गुपित ओठांवर

'कागर'ची टिम सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या निमित्त ते विविध ठिकाणांना तसंच कार्यक्रमांनाही हजेरी लावत आहेत. हाच धागा पकडत 'कागर'ची टिम कलर्स मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या 'एकदम कडक' या कार्यक्रमात पोहोचली. इथंच रिंकूच्या मनातील गुपित ओठांवर आलं. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणाऱ्या गायक आदर्श शिंदेनं प्रश्नांची सरबत्ती करताना तुला कोणासोबत डेट करायला आवडेल? असा प्रश्न रिंकूला विचारला. ऑप्शन्स होते रितेश देशमुख की विकी कौशल. रिंकूनं क्षणाचाही विलंब न लावता विकीचं नाव घेतलं. रिंकूला आवडता अभिनेता कोण असं विचारलं स्वप्नील जोशी कि अंकुश चौधरी तिनं अंकुश चौधरी सांगितलं. 


गंमतीजमती, किस्से, आठवणी 

'एकदम कडक' या कार्यक्रमात येत्या आठवड्यात हा भाग विशेष प्रसारीत होणार आहे. यावेळी दिग्दर्शक नागराज मंजुळे, मकरंद माने, आकाश ठोसर, शुभंकर तावडे, निर्माते सुधीर कोलते, विकास हांडे, शशांक शेंडे यांनी या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली. यावेळी सर्वांनी बऱ्याच गंमतीजमती, किस्से, आठवणी सांगितल्या. नागराजनं बऱ्याच विषयांवर चर्चा केली. वाचनाची आवड कशी लागली त्याबद्दलही सांगितलं. आकाशला त्याची आवडती सहकलाकार कोण विचारण्यात आलं - राधिका आपटे कि रिंकू राजगुरू... यावर त्यानं रिंकूचं नाव घेतलं. आवडता दिग्दर्शक अनुराग कश्यप कि नागराज मंजुळे यावर त्यानं नागराज मंजुळे असं उत्तर दिलं. 


आवडणारी, खटकणारी गोष्ट

याचबरोबर नागराजलाही काही प्रश्न विचारण्यात आले आवडता दिग्दर्शक कोण महेश मांजरेकर कि सचिन पिळगावकर ? आवडता अभिनेता कोण आकाश ठोसर कि सोमनाथ अवघडे ? याची उत्तरं त्यानं काय दिली या विशेष भागात पाहायला मिळेल. चक्रव्यूह राउंडमध्ये नागराजला अजय–अतुल, रामदास आठवले, आकाश ठोसर, जितेंद्र जोशी, रिंकू राजगुरू यांच्याबद्दल आवडणारी आणि खटकणारी गोष्ट विचारली गेली.


गाण्यावर डान्स

रिंकू आणि शुभंकर यांनी 'कागर'मधील 'लागलीया गोडी तुझी...' या गाण्यावर डान्स सादर केला. 'कागर' या चित्रपटातील संपूर्ण टीमनं आपापला चित्रिकरणादरम्यानचा अनुभव, किस्से, भुमिकेबद्दल आणि कथेबद्दल सांगितलं. रिंकूनं सांगितलं की, 'कागर'सारखा चित्रपट येण्याची मी वाट बघत होते कारण यातली माझी भूमिका वेगळी असून, चित्रपटाचा विषय देखील खूप वेगळा आहे. 'कागर'चा दिग्दर्शक मकरंद मानेनंही चित्रपटाच्या कथेबद्दल सांगितलं.हेही वाचा -

मराठी चित्रपटसृष्टीत गटबाजी; वर्षा उसगावकरांचा आरोप

कंगना-राजकुमारचे वेडे चाळे पाहिले का?

संबंधित विषय
ताज्या बातम्या