साराभाई फॅमिली रिटर्न्स

Mumbai
साराभाई फॅमिली रिटर्न्स
साराभाई फॅमिली रिटर्न्स
See all
मुंबई  -  

मुंबई - यु आर सो मिडल क्लास, मॉमा, वुप्पी... आणि हायला हे शब्द कानी पडले की एकच चित्र डोळ्यासमोर उभे राहते आणि ते म्हणजे साराभाई वर्सेस साराभाई. दे आर बॅक अगेन. हे ऐकून तुम्ही आनंदी झाला असाल ना ! नक्कीच चेहऱ्यावर हसू आले असेल? टेलिव्हिजन इंडस्ट्रीत अनेक कॉमेडी मालिका आल्या. पण १ नोव्हेंबर २൦൦४ ला सुरू झालेल्या या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले. यात काम करणाऱ्या कलाकारांनी आपल्या अभिनयाने आणि विनोदी शैलीमुळे मालिकेला एका उंचीवर नेऊन ठेवले. २൦൦६मध्ये ही मालिका संपली. त्यानंतर मालिका कधी सुरू होणार याबद्दल लोकांमध्ये खूप उत्सुका होती. गेले कित्येक दिवस यासंदर्भात चर्चाही सुरू होती. अखेर अकरा वर्षांनंतर चाहत्यांच्या इच्छेनुसार साराभाई वर्सेस साराभाई पुन्हा सुरू होत आहे. त्याचासाठी प्रेक्षकांना एक किंवा दोन महिने प्रतिक्षा करावी लागू सकते.

सर्वांचे मनोरंजन करण्यासाठी साराभाई वर्सेस साराभाई ही मालिका टीव्हीवर नाही तर वेब सीरीज म्हणून हॉटस्टारवर पुन्हा येत आहे. या संदर्भात फेसबुकद्वारे साराभाय फॅमेलिने फेसबुकवर लाइव्ह चॅट केले. मालिका आठवड्यातून एकदा टेलिकास्ट होणार आहे.

साराभाय वर्सेस मालिका पुन्हा सुरू होत आहे. पण या वेळी सर्वांचे काय रोल असतील? आणि नवीन कोणती भूमिका पाहायला मिळणार आहे? याचे सर्वांनाच कुतुहूल आहे.


  • साराभाई फॅमिली फ्लॅटमधून पॅन्टहाऊसमध्ये शिफ्ट होणार आहे
  • साहिल आणि मोनिषा यांचा मुलगा यात दाखवण्यात आलाय. ज्याचे नाव गुड्डू आहे
  • साहिल आणि मोनिषा यांच्या मुलाची भूमिका खूप मजेशीर आहे
  • पहिल्या भागात फक्त एक कवी दाखवण्यात आला होता. मात्र या वेळी साहिल आणि मोनिषा यांचा मुलगा गुड्डुही कवी म्हणून दाखवण्यात आलाय. त्यामुळे घरातच रोसेश आणि गुड्डुट चांगलीच चुरशीची स्पर्धा रंगणार यात काय संशय नाही
  • माया साराभाईचा जावई दुशंतचा न्यू लूक यात पाहायला मिळणार आहे

"साराभाई वर्सेस साराभाई पाहताना तुम्हाला जशी मजा आली तशीच मजा तुम्हाला दुसरा भाग पाहून येईल. या वेळी आम्ही मजेशीर कॅरेक्टर्स घेऊन आलोय. ही मालिका लहान पण मजेशीर असेल. साराभाई फॅमेलिची ही नवीन सुरुवात असून नव्या रूपात मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे," असे या मालिकेचे निर्माते आतिष कपाडिया यांनी म्हटले.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.