संस्कृत महोत्सवाचं आयोजन


SHARE

माटुंगा - माटुंगा येथील रामनारायण रुईया महाविद्यालयात 4 आणि 5 फेब्रुवारीला महाभारत महोत्सव झाला. हा महोत्सव संस्कृत विभागातर्फे आयोजित करण्यात आला होता. या वेळी महाभारताचा इतिहास तसंच महाभारताविषयीचे ज्ञान, महाभारतातील काही पैलू आणि त्यावर पडणारे प्रश्न, महाभारतातील शाप-सामाजिक इतिहासाचा मागोवा, लोकमहाभारत, शिल्पांच्या माध्यमातून महाभारत इत्यादी विषयांवर व्याख्याने झाली.

डॉ. अंजली पर्वते, डॉ. सरोज देशपांडे, वैशाली दाबके, प्रा. डॉ. श्रीनंद बापट अशा एकूण 10 मान्यवरांनी या 2 दिवसीय महोत्सवात व्याख्यान दिलं. त्याचबरोबर मनोरंजनात्मक कार्यक्रमात भरतनाट्यम नृत्याविष्कार करण्यात आला. जांभूळ आख्यान या लोकनाट्याचा प्रयोग नंदेश उमप यांनी सादर केला.

यंदाचं या महोत्सवाचं 4 थं वर्ष असून आम्ही दरवर्षी संस्कृत मधील वेगवेगळे विषय या महोत्सवातून लोकांपुढे मांडण्याचा प्रयत्न करतो, असे संस्कृत विभागाच्या प्रमुख मंजुषा गोखले यांनी सांगितले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या