Advertisement

...म्हणून सई, प्रियानं वाढवलं वजन!


...म्हणून सई, प्रियानं वाढवलं वजन!
SHARES

मुंबई - कलाकार म्हटले की त्यांना नेहमीच फिट अॅंड फाईन राहावे लागते. त्यात महिला कलाकारांना तर अधिकच काळजी घ्यावी लागते. पण सध्या मराठी इंडस्ट्रीतल्या दोन अभिनेत्री चक्क वजनदार झाल्या आहेत. त्या अभिनेत्री आहेत प्रिया बापट आणि सई ताम्हणकर.
प्रिया आणि सईने त्यांच्या आगामी 'वजनदार' या सिनेमासाठी वजन वाढवले आहे. कलाकारमंडळींना नेहमी वजन घटवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. पण या दोघींना वजन वाढवण्यासाठी खूप मेहनत करावी लागली आहे. या सिनेमाचे पोस्टर प्रेक्षकांसमोर आले असून, त्यात या दोघी खरंच 'वजनदार' झालेल्या दिसत आहेत.
या चित्रपटात प्रिया बापट आणि सई ताम्हणकर या नायिकांच्या तर अभिनेता सिद्धार्थ चांदेकर हा नायकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. त्याबरोबरच माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांचा मुलगा चिराग हा या चित्रपटाच्या निमित्ताने रूपेरी पडद्यावर पदार्पण करत आहे. येत्या 11 नोव्हेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement