Advertisement

‘लॅक्मे फॅशन वीक’मध्ये सईचा ग्लॅमरस अंदाज

‘लव्ह सोनिया’ या सिनेमामुळे सईला जागतिक पातळीवर प्रसिद्धी मिळत आहे. त्यामुळेच यंदा ‘लॅक्मे फॅशन वीक’मध्ये सईला तब्बल तीन डिझाइनर्सकडून आमंत्रण आलं होतं.

‘लॅक्मे फॅशन वीक’मध्ये सईचा ग्लॅमरस अंदाज
SHARES

सई ताम्हणकर हे नाव सध्या मराठी-हिंदी सिनेमांसोबतच फॅशनच्या जगतातही चांगलंच गाजत आहे. ‘लव्ह सोनिया’ या सिनेमामुळे सईला जागतिक पातळीवर प्रसिद्धी मिळत आहे. त्यामुळेच यंदा ‘लॅक्मे फॅशन वीक’मध्ये सईला तब्बल तीन डिझाइनर्सकडून आमंत्रण आलं होतं.

पुनीत बलाना, दिशा पाटील आणि ज्युली शाह या तीन डिझाइनर्सच्या फॅशन शोजना सईला विशेष आमंत्रण होतं. या तीनही डिझाइनर्सच्या तीन वेगवेगळ्या शोजमध्ये सईचे तीन ग्लॅमरस अंदाज दिसून आले.


सईचा एलिगन्ट लूक

पुनीत बलानाच्या शोमध्ये सई मोनोक्रोमॅटिक ग्राफिक शॉर्ट ड्रेसमध्ये आली होती. मोनोक्रोमॅटिक ड्रेससोबत पोनीटेल आणि ब्लू आयलाइनरमुळे तिचा एलिगन्ट लूक पाहायला मिळाला. या बोहो-चीक लुकमुळे ती सर्वांचंच लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरली.

पुनीत बलानानंतर सईने दिशा पाटीलचाही फॅशन शो अटेंड केला. या शोला सई थ्री पीस लुकमध्ये दिसली. ज्यामध्ये सईने लॅव्हेंडर कलरचा क्रॉप टॉप, पलाझो पँट्स आणि एम्ब्रॉडरी केलेलं जॅकेट घातलं होतं. सईच्या या लूकची खूप प्रशंसा झाली. लॅक्मे फॅशन शोच्या रेड कार्पेटवर सईचा हा लूक हिट असल्याचं फॅशन फोटोग्राफर्सच्या न थांबणाऱ्या क्लिक-क्लिकने दिसून आलं.


ग्लॅमरस अंदाज

जुली शाहच्या ‘अबजीनी’ कलेक्शन असलेल्या फॅशन शोला येताना सईने पेस्टल पींक कलरचा धोतीकट जम्पसूट घातला होता. लिपस्टिक, हिल्स आणि गोल्डन बँगल्सच्या समावेषामुळे या लूकला एक वेगळंच ग्लॅमर आलं. सईच्या या स्टनिंग इव्हिनिंग लूकमूळे ती फॅशन ब्लॅगर्सच्या आकर्षणाचं केंद्र बनली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा