Advertisement

'केदारनाथ'मधून साराची बॉलिवूडमध्ये एन्ट्री


'केदारनाथ'मधून साराची बॉलिवूडमध्ये एन्ट्री
SHARES

अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा अली खान लवकरच बॉलिवूडमध्ये आपल्या करियरची सुरुवात करणार आहे. 'फितूर' या चित्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक कपूर यांच्या केदारनाथ या चित्रपटातून ती अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. 
या चित्रपटात अभिनेता सुशांत सिंह राजपूत हा तिचा जोडीदार असणार आहे. सुशांत आणि सारा शनिवारी मुंबई विमानतळावरून सिनेमाच्या शूटिंगसाठी देहरादूनला जाण्यासाठी निघाले. त्यावेळी त्यांना पाहण्यासाठी चाहत्यांची झुंबड उडाली होती.

या चित्रपटाच्या शुटिंगला 3 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. बालाजी मोशन पिक्चर्ससहित टी-सीरीज, क्रिअर्ज एंटरटेन्मेंट, गाय इन द स्काय पिक्चर्स यांच्या सहकार्याने या सिनेमाची निर्मिती केली जात आहे.

निर्मात्यांच्या या सहकार्यामुळे आमच्या चित्रपटाचे महत्त्व वाढले असून त्यांच्या या सहकार्याबद्दल कृतज्ञ असल्याचे सिनेमाचे निर्माते अभिषेक कपूर म्हणाले.
'ही एक उत्कंठावर्धक प्रेमकथा असून जी तीर्थयात्रेशी निगडीत आहे. सारा खान या चित्रपटासाठी एकदम फिट असल्याचे' अभिषेक कपूर म्हणाले. हा चित्रपट 2018 च्या उन्हाळ्यात रिलीज होण्याची शक्यता आहे.


हेही वाचा -

बॉलिवुड अॅक्टर्सची पुढची पिढी पदार्पणासाठी सज्ज!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा