सायरा बानो यांना राजकपूर जीवनगौरव, तर विक्रम गोखले यांना व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कार

 Mumbai
सायरा बानो यांना राजकपूर जीवनगौरव, तर विक्रम गोखले यांना व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कार

वांद्रे रेक्लमेशन येथील म्हाडा मैदानावर 54 वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळा शनिवारी सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत पार पडला. ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांना राजकपूर जीवनगौरव तसेच ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेते जॅकी श्रॉफ यांना राजकपूर विशेष योगदान पुरस्कार आणि मराठी ‍चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे यांना चित्रपती व्ही. शांताराम पुरस्कार प्रदान करण्यात आला.  राज्य सरकारचा हा कार्यक्रम रात्री दहानंतरही सुरू ठेवण्यात आला होता. मात्र मंत्री हजर असल्यामुळे पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही.

महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सहात ‘कासव’ हा चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. सर्वोत्कृष्ट चित्रपट क्रमांक दोनचा मान ‘दशक्रिया’ या चित्रपटाला आणि सर्वोकृष्ट चित्रपट क्रमांक तीनचा मान ‘व्हेंटिलेटर’ या चित्रपटाला मिळाला. त्याचप्रमाणे उत्कृष्ट अभिनेता म्हणून मंगेश देसाई यांना एक ‘अलबेला’ या चित्रपटासाठी पुरस्कार देण्यात आला. उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार इरावर्ती हर्षे यांना ‘कासव’ चित्रपटासाठी प्राप्त झाला. 

Loading Comments