रिंकूने शाळा सोडली ?


SHARE

छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच याड लावणाऱ्या सैराट सिनेमानंतर आर्ची आणि परश्याला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. मात्र ही प्रसिद्धी आणि प्रेक्षकांचे प्रेम त्यांना चांगलेच महागात पडले आहे.  सध्या त्यांना सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा रक्षकांशिवाय जाणेही शक्य नाही. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आर्चीने शाळा सोडली आहे.  दहावीच्या महत्त्वाच्या वर्षात शाळा सोडून तिने १७ नंबरचा फॉर्म भरला असल्याची माहिती हाती आली आहे. काही दिवसांपूर्वी तिने शाळा रुजू केली होती. पण शाळेत गेल्यावर मुलांची तिच्याच भोवती जास्त गर्दी वाढते. त्यामुळे तिने शाळा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. रिंकूच्या वडिलांनी तिच्यासाठी एसएससीचा १७ नंबरचा फॉर्म भरला. त्यामुळे ती एसएससी बोर्डाची परीक्षा बाहेरूनच देणार असल्याची चर्चा आहे. 

 

संबंधित विषय