Advertisement

साहिर आणि शैलेंद्र


SHARES

दादर - साहिर लुधियानवी आणि शैलेंद्र यांनी लिहिलेली सुमारे 50 वर्षांपूर्वीची गाणी आजही श्रोत्यांना मंत्रमुग्ध करतात... दादरच्या सावरकर सभागृहात झालेल्या कार्यक्रमात याचाच पुन्हा प्रत्यय आला... द्वारकानाथ संझगिरींच्या कल्पनेतून या अजरामर गीतकारांना आदरांजलीसाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं... गाण्यांसोबतच साहिर आणि शैलेंद्र यांच्या आयुष्यातले काही किस्सेही संझगिरी यांनी सांगितले...
या वेळी संझगिरी यांनी लिहिलेल्या तिरकिटधा या पुस्तकाचं प्रकाशन प्रसिद्ध गीतकार अशोक पत्की यांच्या हस्ते करण्यात आलं. रिमिक्स, पॉप आणि जॅझच्या जमान्यातही साहिर आणि शैलेंद्र यांच्या अजरामर गीतांची जादू अद्याप ओसरलेली नाही, हे या कार्यक्रमातून स्पष्ट झालं.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा