Advertisement

आॅनस्क्रीन आनंदीबाईंना सरस्वती पुरस्कार

हा पुरस्कार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यम आणि संज्ञापन विभागातर्फे (DMCS) घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी भाग्यश्रीला प्रदान करण्यात आला. या प्रसंगी 'आनंदी गोपाळ' चित्रपटाची टीमही उपस्थित होती.

आॅनस्क्रीन आनंदीबाईंना सरस्वती पुरस्कार
SHARES

समीर विद्वांसच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला 'आनंदी गोपाळ' हा मराठी सिनेमा प्रेक्षकांवर मोहिनी घालत असतानाच या सिनेमातील आॅनस्क्रीन आनंदीबाईंना सरस्वती पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे.


महिला डॅाक्टरची कथा

झी टॅाकीजच्या बॅनरखाली तयार झालेल्या 'आनंदी गोपाळ' या सिनेमात समीरनं भारतातील पहिल्या महिला डॅाक्टर बनलेल्या आनंदीबाई गोपाळराव जोशी यांची कथा मांडली आहे. प्रतिकूल परिस्थितीत आनंदीबाई आणि त्यांचे पती गोपाळराव यांनी प्रवाहाविरोधात पोहण्याचा केलेला प्रयत्न अनेकांना प्रेरणादायी ठरणारा आहे. याचीच दखल घेत या सिनेमात आनंदीबाईंची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री भाग्यश्री मिलिंद हिला सरस्वती फाळके यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा 'सरस्वती' पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं.


राष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सव

हा पुरस्कार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यम आणि संज्ञापन विभागातर्फे (DMCS) घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी भाग्यश्रीला प्रदान करण्यात आला. या प्रसंगी 'आनंदी गोपाळ' चित्रपटाची टीमही उपस्थित होती. यात आनंदीबाई जोशी यांची भूमिका साकारणारी भाग्यश्री मिलिंद ही अभिनेत्री, तसंच सिनेमात गोपाळराव जोशी यांची भूमिका साकारणारा अभिनेता ललित प्रभाकर आणि दिग्दर्शक समीर विद्वांस यांचा समावेश होता.


विशिष्ट काळाचं दर्शन 

या प्रसंगी बोलताना प्राध्यापक समर नखाते यांनी 'आनंदी गोपाळ' हा सिनेमा प्रेक्षकांना एका विशिष्ट काळाचं दर्शन घडवण्यात यशस्वी झाल्याचं सांगितलं. या सोहळ्याला उपस्थित असलेल्या ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनीही समीरच्या कामाचं तोंड भरून कौतुक केलं. दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचं यंदाचं आठवं वर्ष आहे. या महोत्सवासाठी देशभरातून अनेक लघुचित्रपटकारांनी आपला सहभाग नोंदवला आहे. पुणेकरांनीही या महोत्सवाला उस्फुर्त प्रतिसाद दिल्याचं चित्र राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या आवारात सुरू असलेल्या या महोत्सवात पाहायला मिळालं.हेही वाचा - 

या शिमग्याला राजेश-भूषण आमनेसामने!
संबंधित विषय