Advertisement

'कास्टिंग काऊच' सिझन 3, लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला


'कास्टिंग काऊच' सिझन 3, लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
SHARES

साचेबद्ध मालिका आणि ठराविक प्रकारच्या रिअॅलिटी शोला आता प्रेक्षक कंटाळले आहेत. हजार एपिसोडची एक मालिका बघण्यापेक्षा प्रेक्षक आता छोट्या-छोट्या वेबसिरीजला पसंती देतात. यातील एका वेबसिरीजचं नाव हमखास घेतलं जाते, ते म्हणजे 'कास्टिंग काऊच'. कास्टिंग काऊचच्या पहिल्या दोन सिझनला प्रेक्षकांनी अक्षरशा: डोक्यावर घेतलं आहे. अभिनेता अमेय वाघ आणि दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी या जोडीने प्रेक्षकांना 'कास्टिंग काऊच'मध्ये खिळवून ठेवलं. आता ही जोडी पुन्हा एखदा 'कास्टिंग काऊच'च्या वेबसिरीजच्या माध्यमातून धुमाकूळ घालणार आहे.


'कास्टिंग काऊच'ची पुन्हा एन्ट्री

या सिझनमध्ये आधीच्या सिझनप्रमाणे सेलेब्रेटींची हटके पद्धतीने मुलाखत घेण्यात येणार आहे. या सिझनमध्ये अमेय वाघ आणि निपूण 'कास्टिंग काऊच' साठी सेलेब्रेटींचा इन्टरव्ह्यू घेणार आहेत. मार्चच्या पहिल्या आठवड्यात कास्टिंग काऊचचा तिसरा सिझन सुरू होण्याची शक्यता आहे. अशी पोस्टच निपुण धर्माधिकारी याने फेसबुकवर शेअर केली आहे.

गेले वर्षभर अमेय आणि निपुण आपापल्या कामात व्यग्र असल्यामुळे 'कास्टिंग काऊच'चा तिसरा सिझन सुरू करू शकले नाहीत. गेल्या वर्षात अमेयचे मुरांबा आणि फास्टर फेणे आणि निपुणचा धर्माधिकारी दिग्दर्शित बापमाणूस हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. मात्र आता लवकरच कास्टिंग काऊचचा तिसरा सिझन सुरू होणार आहे. याआधी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक सेलेब्रेटींनी कास्टिंग काऊचला हजेरी लावली होती. त्यामुळे आता या सिझनमध्ये कोण-कोणते सेलेब्रेटी येणार हे पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा