Advertisement

सेलिब्रिटींच्या उपस्थितीत 'भिकारी'चं म्युझिक लॉन्च


 सेलिब्रिटींच्या उपस्थितीत 'भिकारी'चं म्युझिक लॉन्च
SHARES

स्वप्नील जोशीच्या आगामी 'भिकारी' या सिनेमाची बरीच चर्चा आहे. या सिनेमातीच म्युझिक लॉन्च नुकतंच रोहित शेट्टी, तुषार कपूर, बॉबी देओल आणि श्रेयस तळपदे यांच्या उपस्थितीत लाँच करण्यात आलं आहे. 

'काशा' हे गाणं अवधूत गुप्ते, आनंद शिंदे यांनी गायलं असून गणेश आचार्य यांचा आवाजदेखील आपल्याला या गाण्यात ऐकता येणार आहे. 'भिकारी' सिनेमातील महत्त्वाचे वळण या गाण्यात दिसत आहे. 

या आधी सिनेमातलं 'देवा हो देवा' हे गाणं वरुण-आलिया यांच्या हस्ते लॉन्च केलं गेलं.



श्रावणात प्रदर्शित होत असलेला हा सिनेमा आई आणि मुलाच्या भावनिक नात्यावर भाष्य करणारा आहे. येत्या ४ ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमात स्वप्नील जोशीसोबतच ऋचा इनामदार, कीर्ती आडारकर, गुरु ठाकूर, सयाजी शिंदे, मिलिंद शिंदे आणि प्रदीप काबरा हे कलाकार देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा