Advertisement

चांगला माणूस बनून जगा - शंकर महादेवन


चांगला माणूस बनून जगा - शंकर महादेवन
SHARES

गायक-संगीतकार शंकर महादेवन हे भारतीय संगीत क्षेत्रातील एक आघाडीचं नाव आहे. गायन आणि संगीतासोबतच त्यांचं अभिनयाचं अंगही सर्वांनी पाहिलं आहे. हेच शंकर महादेवन आपल्या गाण्यातून रामाची गोष्ट सांगत आहेत.

‘सूर निरागस हो...’ असं म्हणत केवळ संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे, तर जगभरातील चाहत्यांना एक सुरेल गाणं देणाऱ्या शंकर महादेवन यांच्या सुमधूर आवाजात भगवान श्रीरामाची गोष्ट ऐकायला मिळणार आहे. नाही, त्यांनी रामायण वगैरे गायलेलं नाही... राष्ट्रीय पारितोषिक विजेता दिग्दर्शक मकरंद मानेच्या ‘यंग्राड’ या आगामी मराठी सिनेमात महादेवन यांनी एक गाणं गायलं आहे. या निमित्ताने ‘मुंबई लाइव्ह’शी खास बातचीत करताना आजच्या काळातील तरुण गायक-गायिकांनाही महादेवन यांनी मोलाचा सल्ला दिला.


गोष्ट सांगतो श्रीरामाची

‘यंग्राड’ या सिनेमाचा संगीत प्रकाशन सोहळा शंकर महादेवन यांच्या हस्ते संपन्न झाला. या सिनेमातील ‘हे रामा, रं दाजी रं... गोष्ट ऐका श्रीरामाची...’ हे गाणं महादेवन यांनी गायलं आहे. ‘यंग्राड’चं शीर्षक गीत असलेल्या या गाण्याला महादेवन यांनी आपल्या गायकीने एक वेगळीच रंगत आणली आहे. या गाण्यात ते कोणत्या श्रीरामाची गोष्ट सांगणार आहेत ते सिनेमा पाहिल्यावरच समजेल.


तरुण संगीतकाराचं मनमोहक संगीत

हृदय गट्टानी या तरुण संगीतकाराने ‘यंग्राड’ मधील गीतांना संगीत दिलं आहे. यााबाबत महादेवन म्हणाले की, दिपक गट्टानी हे माझे खूप जवळचे मित्र आहेत. त्यांचा मुलगा हृदय याने या सिनेमाला संगीत दिलं आहे. तो मला माझ्या मुलासारखा आहे. सिद्धार्थ, शिवम यांच्यासोबतच खेळत तो लहानाचा मोठा झाला आहे. त्यामुळे आमचे घरगुती संबंध आहेत. जेव्हा मला समजलं की, तो या सिनेमाला संगीत देत आहे, तेव्हा मला खूप आनंद झाला.


मनापासून दिलेलं संगीत

प्रथमच संगीत देणाऱ्या हृदयने ‘यंग्राड’च्या माध्यमातून खूप मनमोहक कामगिरी केली आहे. खूप चांगलं कंपोजींग केलं आहे. या सिनेमाच्या गाण्यांसाठी हृदयने मनापासून काम केल्याचं गाणी ऐकताना जाणवतं. हृदयच्या संगीतात एक खोली असल्याची गोष्ट मला खूप भावली. रसिकांनाही या सिनेमातील गाणी नक्कीच आवडतील.


गावातील गोष्ट सांगणार

‘यंग्राड’ मधील हे गीत गावातील गोष्ट सांगणारं आहे. गाणं जरी गावाकडच्या शैलीत असलं, तरी हृदयने ते मॅाडर्न शैलीत बसवलं आहे. त्यामुळे हे गाणं गाताना एक वेगळंच फिलींग येत होतं. हृदयने इतकी सुरेख संगीतरचना तयार कली आहे यावर विश्वास बसत नव्हता. त्याचं काम पाहून भारावून गेलो होतो. हे गाणं गाण्याची संधी मला मिळालं यासाठी मी देवाचे आभार मानतो.


मकरंदचं दिग्दर्शन

मकरंदकडून जेव्हा या सिनेमाची कथा थोडक्यात ऐकली, तेव्हा मला ती आवडली. खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. मकरंदला ‘रिंगण’ या सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे ‘यंग्राड’ च्या माध्यमातून जी कथा सादर केली आहे त्यालाही असंच यश मिळेल. यशाची हवा डोक्यात जाऊ न देता त्याने पुन्हा नव्या जोमाने काम केलं आहे.


गायनात रंगलेत सिद्धार्थ-शिवम

सिद्धार्थ आणि शिवम हे महादेवन यांचे दोन्ही पुत्रही गायन-संगीतात करियर घडवत आहेत. त्यांच्याबद्दल महादेवन म्हणाले की, सिद्धार्थ सध्या गायन आणि संगीतावर फोकस करत आहे. एका आगामी मराठी सिनेमाला त्याने संगीतही दिलं आहे. हिंदी सिनेमासाठीही गाणी गात आहे. परफॅार्मही करतो आहे. आता अमेरिकेच्या टूरवर चालला आहे. त्याचे परदेश दौरे सुरूच असतात. शिवम यंदा बारावीला शिकत आहे. त्यामुळे अभ्यास आणि गायन यांचा ताळमेळ साधण्याचा प्रयत्न करत आहे. दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या ‘मेरे प्यारे प्राइम मिनीस्टर’ या हिंदी सिनेमासाठी शिवमने एक सुंदर गाणं गायलं आहे.


गायनातही सेवाभाव हवा

थोडंसं गाणं गाता आलं की, जे गायक अॅटीट्युड दाखवतात त्यांच्याबाबत मला काहीही बोलायचं नाही. पण मला स्वत:ला असं वाटतं की, या पृथ्वीतलावर तुम्ही कितीही चांगलं गाणं गा, पण तुम्ही एक चांगले मनुष्य नसाल तर कालांतराने तुम्हाला कोणीही विचारणार नाही. तुमचं वागणं चांगलं असलं, तर तुमची आठवण गायनासाठीही काढली जाईल आणि चांगल्या स्वभावासाठीही... चांगल्या गायकापेक्षाही चांगला माणूस बनून जगणं हे खूप महत्त्वाचं आहे.हेही वाचा - 

‘होऊ दे चर्चा’ टास्कसाठी पुष्कर करणार व्हॅक्सिंग!

शमिताची सुपर कूल बीएमडब्ल्यूसंबंधित विषय
Advertisement