Advertisement

बिग बाॅस : भूषण, शर्मिष्ठा, स्मिता नॅामिनेट


बिग बाॅस : भूषण, शर्मिष्ठा, स्मिता नॅामिनेट
SHARES

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सोमवारी सर्व सदस्यांसमोर नॉमिनेशन प्रक्रिया पार पार पडली. हा खेळ वैयक्तिकरीत्या कसा खेळायचा हे प्रत्येक सदस्यावर अवलंबून आहे. बिग बॉसच्या घरात काही अपात्र सदस्य असतील ज्यांना अजूनही हा खेळ खेळता येत नाही अथवा हा खेळ समजण्याइतपत बौद्धिक चातुर्य नाही, म्हणूनच नॉमिनेशन प्रक्रिया सर्वांसमोर उघडपणे पार पडली. 

या आठवड्यामध्ये बिग बॉसच्या घरामधून घराबाहेर जाण्यासाठी शर्मिष्ठा, भूषण हे नॉमिनेट झाले. तर घराची कॅप्टन सईला एका विशेष अधिकार देण्यात आला, ज्यानुसार ती कोणत्याही एका सदस्याला या प्रक्रियेमध्ये नॉमिनेट करू शकते. यावेळी सईने स्मिताला नॉमिनेट केले. त्यामुळं या आठवड्यामध्ये कोण घराबाहेर जाणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.


सई, स्मिताच्या अाईची भेट

बिग बॉसच्या घरातील सदस्य आता नवव्या आठवड्यामध्ये पोहचले असून संयमासोबतच आत्मनिग्रह तपासून पाहण्याची वेळ आली आहे. यासाठी बिग बॉस सदस्यांवर फ्रीझ – रीलीझ हे साप्ताहिक कार्य सोपवणार आहेत. या कार्याअंतर्गत बिग बॉसच्या घरामध्ये सदस्यांना बिग बॉस एक सरप्राईझ देणार आहेत. मंगळवारी घरात उषा नाडकर्णी यांचा मुलगा, स्मिताची आई तसेच सईची आई येणार आहेत. नंदकिशोर यांच्याप्रती उषा नाडकर्णी यांचा मुलगा त्याची नाराजी व्यक्त करताना दिसणार आहे. त्यांनी जे काही केलं ते चुकीचं असल्याचंही सांगणार आहे. स्मिताची आई घरामध्ये आल्यावर पहिल्यांदा आऊंना भेटणार आहे. तर सई आईला बघून खूपच भावूक होईल. प्रत्येक सदस्याच्या परिवारातील सदस्यांनी घरातील सगळ्या सदस्यांना एक संदेश दिला आहे.
हेही वाचा -

पूजा म्हणते, ‘दिल ही तो है’

दिपाली सय्यदचा अनाथांना हात!संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा