Advertisement

पूजा म्हणते, ‘दिल ही तो है’

विविधांगी भूमिकांच्या माध्यमातून स्वत:चं वेगळं अस्तित्व सिद्ध करणारी पूजा ‘दिल ही तो है’ या मालिकेत आरोही नावाच्या तरुणीची भूमिका साकारणार आहे.

पूजा म्हणते, ‘दिल ही तो है’
SHARES

सोनी एंटरटेन्मेंट वाहिनीवर लवकरच एक नवी मालिका सुरू होणार आहे. या मालिकेचं शीर्षक आहे ‘दिल ही तो है’…

‘दिल ही तो है’च्या टिममध्ये आता पूजा बॅनर्जी या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रीची एंट्री झाली आहे. विविधांगी भूमिकांच्या माध्यमातून स्वत:चं वेगळं अस्तित्व सिद्ध करणारी पूजा ‘दिल ही तो है’ या मालिकेत आरोही नावाच्या तरुणीची भूमिका साकारणार आहे. यासोबतच या मालिकेत योगिता बिहाणी ही पलक शर्माच्या भूमिकेत आहे. एकता कपूरची निर्मिती असल्याने या मालिकेकडून खूप अपेक्षा आहेत.


मालिकेबाबत उत्सुक

यापूर्वीही एकताच्या मालिका आणि वेबसिरीजमध्ये अभिनय केलेल्या पूजाला ‘दिल ही तो है’ बाबत खूप उत्सुकता आहे. या मालिकेचा कॅनव्हास खूप मोठा असल्याचं मानणाऱ्या पूजाच्या मते कथानक रोमांचक असून यातील तिची व्यक्तिरेखा खूप स्टायलिश आहे. यासाठी पूजाच्या लुक आणि कपड्यांवर विशेष काम करण्यात आलं आहे

.

परदेशात असताना आॅफर

पूजाला जेव्हा या मालिकेची अाॅफर मिळाली तेव्हा ती परदेशात होती. पूजा म्हणते की, जेव्हा प्राॅडक्शन हाऊसकडून फोन आला, तेव्हा इंडोनेशियात होते. माझ्यासाठी बालाजी हे एक कुटुंबच असल्याने कोणताही प्रश्न न विचारता, पटकथा आणि व्यक्तिरेखेबाबत जाणून न घेताच होकार दिला. या मालिकेच्या निमित्ताने सोनी एंटरटेन्मेंट वाहिनीसोबत प्रथमच काम करत असल्यानं एक वेगळाच उत्साह आहे.हेही वाचा -

सरकारी योजनांचा बोलबाला

'सलमान सोसायटी’ तील चांडाळ चौकडी संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा