Advertisement

चांदणं रातीला ‘शिमगा’ आला...

कोकणातील शिमगा यंदा सिनेमागृहांमध्ये दिसणार असून, शिमग्यातील पालखी रुपेरी पडद्यावर नाचताना पाहायला मिळणार असल्याची बातमी आम्ही यापूर्वीच दिली आहे. या जोडीला आता ‘चांदणं रातीला शिमगा आला…’ हे होळीच्या सणाचा आनंद द्विगुणीत करणारं ‘शिमगा’ सिनेमातील गाणंही प्रदर्शित करण्यात आलं आहे

चांदणं रातीला ‘शिमगा’ आला...
SHARES

कोकणातील शिमगा यंदा सिनेमागृहांमध्ये दिसणार असून, शिमग्यातील पालखी रुपेरी पडद्यावर नाचताना पाहायला मिळणार असल्याची बातमी आम्ही यापूर्वीच दिली आहे. या जोडीला आता ‘चांदणं रातीला शिमगा आला…’ हे होळीच्या सणाचा आनंद द्विगुणीत करणारं ‘शिमगा’ सिनेमातील गाणंही प्रदर्शित करण्यात आलं आहे.


शिमगा सणाचा अनुभव

‘होळी रे होळी पुरणाची पोळी…’ म्हणत कोकणात शिमगा साजरा केला जातो. हा सण साजरा करण्यासाठी सगळे गावकरी ग्रामदेवतेच्या देवळात जमतात. नाचत ढोलताश्यांच्या गजरात, होम करून धुमधडाक्यात शिमगा साजरा करतात. हा सण साजरा करताना गावातील वाडी-वाडीमध्ये पालखी नाचवताना जुगलबंदी देखील होते. अशा या शिमगा सणाचा अनुभव संपूर्ण महाराष्ट्राला देण्यासाठी 'शिमगा' हा चित्रपट १५ मार्चला प्रदर्शित होत आहे.


उत्साहवर्धक गाणं

नुकतंच या चित्रपटातील 'चांदणं रातीला आला शिमगा…' हे उत्साहवर्धक गाणं सोशल मीडियावर प्रदर्शित झालं आहे. या गाण्यात भूषण प्रधान, राजेश शृंगारपुरे, कमलेश सावंत नाचताना दिसतात. या गाण्यामध्ये अगदी पारंपरिक पद्धतीनं म्हणजेच ढोल-ताशांच्या गजरात, जल्लोषात शिमगा म्हणजेच होळी सण साजरा होत असल्याचं पाहायला मिळतं. शिमगा सणामध्ये होळीला नारळ, पुरणपोळी अर्पण करण्याची प्रथासुद्धा या गाण्यात दाखवण्यात आली आहे.




अविश्रांत मेहनत

या गाण्याचं शूटिंग कोकणातील लांजा तालुक्यातील आसगे या गावी करण्यात आलं आहे. दिवसभर चित्रपटातील इतर दृश्यांचं आणि संध्याकाळ झाली की, गाण्याचं शूटिंग केलं जायचं. तीन दिवस सतत चित्रपटाच्या संपूर्ण टीमनं अविश्रांत मेहनत घेऊन हे गाणं चित्रित केलं आहे. होळीचा होम पेटवल्यानंतर त्याच्या आजूबाजूला नाचताना खूप त्रास होत होता. पेटत्या होळीच्या झळांमुळे नाचताना चटकेही बसायचे. होळी पेटवण्यासाठी जे कोरडं गवत लागायचं ते गवत पेटवताक्षणी काही सेकंदात जळून जायचं. त्यामुळं खूपच कमी वेळात या गाण्यातील जास्तीत जास्त सीन शूट करण्यात आले आहेत.




भारदस्त आवाज

कोरिओग्राफर दीपाली विचारेने या गाण्याचं नृत्यदिग्दर्शन केलं आहे. हे गाणं वलय यांनी लिहिलं असून, पंकज पडघन यांनी संगीतबद्ध केलं आहे. सौरभ साळुंखे यांनी आपल्या भारदस्त आवाजात हे गाणं गायलं आहे. मूळचे कोकणाचे असणाऱ्या निलेश कृष्णाजीराव पालांडे ऊर्फ निलेश कृष्णा यांनी या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात राजेश, भूषण आणि कमलेश यांच्यासह विजय आंदळकर, सुकन्या सुर्वे आणि नवोदित अभिनेत्री मानसी पंड्या यांच्या भूमिका आहेत.




हेही वाचा -

क्रीडा महोत्सवात मुंबई विद्यापीठाची अजिंक्यपदाची हॅट्रीक

मौनी रॉयचे डिफरंट डाएट्स!



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा