SHARE

मुंबईत दिवसेंदिवस स्वाइन फ्लूचा कहर वाढतच आहे. यामुळे आतापर्यंत मुंबईतल्या 5 जणांना आपला जीव गमवावा लागला. आता बॉलिवूडकरही स्वाइन फ्लूमुळे त्रस्त झाले आहेत.


श्रेयस तळपदेच्या पत्नीला स्वाईन फ्लूची लागण

अभिनेता श्रेयस तळपदे याची पत्नी दीप्ती आजारी असल्याने तिला मंगळवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हा वैद्यकीय चाचणीत तिला स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे समजले. श्रेयस सध्या 'पोस्टर बॉईज' आणि 'गोलमाल अगेन' या दोन चित्रपटांच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. सोमवारी रात्री शूटिंगवरून आल्यानंतर दीप्तीची तब्येत अचानक बिघडल्याचे त्याला समजले. त्यामुळे त्याने मंगळवारी उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल केले आणि पुन्हा शूटिंगसाठी निघाला.

'पोस्टर बॉईज' या चित्रपटाद्वारे तो दिग्दर्शनक्षेत्राकडे वळत असून हा चित्रपट 8 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. 'गोलमाल अगेन'मध्येही तो मुख्य भूमिकेत आहे. पण चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जसा ब्रेक मिळतो, त्यावेळी तो दीप्तीकडे जातो.हेही वाचा -

मुंबईत जूनमध्ये 107 स्वाईन फ्लूच्या रुग्णांची नोंद

मुंबईकरांच्या मानगुटावर स्वाईन-फ्लू आणि लेप्टोचं भूत!


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 

संबंधित विषय
ताज्या बातम्या