मुंबईकरांच्या मानगुटावर स्वाईन-फ्लू आणि लेप्टोचं भूत!

  Mumbai
  मुंबईकरांच्या मानगुटावर स्वाईन-फ्लू आणि लेप्टोचं भूत!
  मुंबई  -  

  पावसाळ्यामध्ये वाढणाऱ्या स्वाईन फ्लूसारख्या आजारांना आवर घालण्यासाठी मुंबई महापालिकेकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र रुग्णांची आकडेवारी पहाता महापालिकेच्या या उपाययोजना कमी पडत असल्याचंच चित्र समोर येत आहे. त्यामुळे या पावसाळ्यात मुंबईकरांनी आपली जास्त काळजी घेणं गरजेचं आहे.

  गेल्या महिन्याभरात मुंबईत स्वाईन फ्लूचा प्रभाव वाढताना दिसून येत आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या 15 दिवसांमध्येच स्वाईन फ्लूमुळे 5 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात स्वाईन फ्लूचा फक्त एकच रुग्ण आढळून आला होता. पण यावर्षी फक्त जुलै महिन्यातच 250 रुग्णांची नोंद पालिकेच्या वेगवेगळ्या रुग्णालयांत करण्यात आली आहे. शिवाय, जानेवारी ते जुलै या सात महिन्यांत मुंबईत 672 स्वाईन फ्लूच्या रुग्णांची नोंद झाली असून 22 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.


  मुंबईतील आजारांची आकडेवारी


  आजार
  जुलै 2016 (रुग्ण)
  जुलै 2016 (मृत्यू)
  जुलै 2017 (रुग्ण)
  जुलै 2017 (मृत्यू)
  डेंग्यू
  63
  0
  28
  0
  लेप्टो
  76
  3
  23
  2
  मलेरिया
  583
  1
  309
  0
  गॅस्ट्रो
  1672
  0
  544
  0
  हेपेटायटिस
  135
  0
  88
  0
  स्वाईन फ्लू
  1
  0
  250
  5
  कॉलरा
  7
  0
  1
  0  जुलै महिन्याच्या पहिल्या 15 दिवसांमध्ये वांद्रे येथे राहणाऱ्या 57 वर्षीय व्यक्तीचा, बोरिवली पश्चिममधील 41 वर्षीय महिलेचा, तर गोरेगाव पूर्वमध्ये राहणाऱ्या 45 वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला आहे. परळ येथे राहणाऱ्या 65 वर्षीय महिलेलाही मृत्यू स्वाईन फ्लूची लागण होऊन झाल्याचे समोर आले आहे.

  मानखुर्द परिसरात यंदाच्या वर्षी कॉलराचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. 1 जुलै ते 15 जुलै या कालावधीत डेंग्यूच्या 125 संशयित रुग्णांची नोंद झाली असून या रुग्णांवर महापालिकेच्या विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.


  मुंबईत आतापर्यंत 2,230 घरांचे सर्वेक्षण

  स्वाईन-फ्लूच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मुंबईत आतापर्यंत 2230 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणादरम्यान 18 जणांमध्ये या आजाराची प्राथमिक लक्षणे आढळून आल्याने त्यांना टॅमी-फ्लू हे औषध देण्यात आले आहे.


  • जानेवारी ते जुलै 2017 - 55,531 रुग्णांची तपासणी
  • संशयित 2,839 रुग्णांना टॅमी-फ्लूचे औषध
  • 874 लोकांना स्वाईन-फ्लूचे निदान
  • यात 672 रुग्ण मुंबईतले तर 202 रुग्ण मुंबई बाहेरचे


  लेप्टोमुळे दोघांचा बळी

  स्वाईन-फ्लूसह आता लेप्टोनेही मुंबईत डोके वर काढले आहे. 2017 च्या जुलै महिन्यात लेप्टोचे 23 रुग्ण आढळले होते. आतापर्यंत, मुंबईतील झोपडपट्टी परिसरात 860 घरांचे सर्वेक्षण करुन 4,850 कुटुंबांना लेप्टोसंदर्भात माहिती दिली जात आहे.
  हेही वाचा - 

  स्वाईन फ्लूच्या औषधांसाठी येथे संपर्क साधा


  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.