Advertisement

सिद्धार्थ शुक्लाचा शवविच्छेदन अहवाल मुंबई पोलिसांकडे सुपूर्द

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचा शवविच्छेदन अहवाल कूपर हॉस्पिटलनं मुंबई पोलिसांना सोपवला आहे.

सिद्धार्थ शुक्लाचा शवविच्छेदन अहवाल मुंबई पोलिसांकडे सुपूर्द
SHARES

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचा शवविच्छेदन अहवाल कूपर हॉस्पिटलनं मुंबई पोलिसांना सोपवला आहे. ओशिवरा पोलिस स्टेशनमधील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अहवालात सिद्धार्थच्या शरीरावर कोणत्याही बाह्य जखमेच्या खुणा आढळल्या नाहीत. सव्वा ४ तास चाललेल्या पोस्टमॉर्टमची व्हिडीओग्राफीही करण्यात आली.

हा अहवाल ५ डॉक्टरांच्या टीमनं तयार केला आहे. त्याचे शवविच्छेदन ३ तज्ञ डॉक्टरांनी केलं आहे. मुंबई पोलिस या प्रकरणात कोणताही चान्स घेणार नाही. सिद्धार्थचा व्हिसेरा फॉरेन्सिक तपासणीसाठी कलिना फॉरेन्सिक लॅबला पाठवला जाईल.

हिस्टोपॅथॉलॉजिकल रिपोर्ट आल्यानंतर हे स्पष्ट होईल की हा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाला आहे की इतर काही कारणांमुळे. मुंबई पोलिसांकडून फक्त एवढेच सांगण्यात आलं आहे की, आम्ही कोणत्याही अंतिम निर्णयापर्यंत घाईघाईनं पोहोचू इच्छित नाही. आम्ही अद्याप रासायनिक आणि विश्लेषण अहवालाची वाट पाहत आहोत.

सिद्धार्थचा मृतदेह सेलिब्रेशन क्लबमध्ये शेवटच्या दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. यावेळी अनेक कलाकारांनी सिद्धार्थच्या अंतिम दर्शनाला हजेरी लावली.

सिद्धार्थ शुक्लाचं गुरुवारी निधन झाल्याची बातमी समोर आली. हॉस्पिटलच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याचे कुटुंबीय त्याला सकाळी १०.३० च्या सुमारास कूपर हॉस्पिटलमध्ये घेऊन आले. त्याचा आधीच मृत्यू झाल्याचं तपासात उघड झालं. अभिनेत्याच्या कुटुंबानं, त्यांच्या जनसंपर्क संघाद्वारे, एक निवेदन प्रसिद्ध करून माध्यमांना कुटुंबाच्या गोपनीयतेची काळजी घेण्यास सांगितलं.

कुटुंबानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, 'आम्ही सर्व दुःखात आहोत. आम्हाला तुमच्यासारखाच धक्का बसला आहे आणि आम्हाला सर्वांना माहित होते की सिद्धार्थ एक खाजगी व्यक्ती आहे, म्हणून कृपया त्याच्या गोपनीयतेचा, त्याच्या कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करा आणि कृपया त्याच्या आत्म्याला शांती लाभो ही प्रार्थना करा.



हेही वाचा

राहुल महाजननं सांगितली सिद्धार्थच्या नातेवाईकांची अवस्था, शहनाज गिल तर...

सिद्धार्थ शुक्लाची शेवटची पोस्ट व्हायरल, 'धन्यवाद' म्हणत...

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा