किशोरीताई आमोणकर अनंतात विलीन

Mumbai  -  

प्रभादेवी - शास्त्रीय संगीतातील एक दिग्गज आणि आघाडीच्या गायिका किशोरीताई आमोणकर यांचे सोमवारी रात्री निधन झाले. त्या ८५ वर्षांच्या होत्या. त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे कला अकादमीत ठेवण्यात आले होते. अंत्यदर्शनासाठी साहित्य, राजकीय, शास्त्रीय संगीत, नाट्य क्षेत्रातील अनेक दिग्गजांसह कलाक्षेत्रातील अनेक मान्यवरांनी या वेळी उपस्थिती दर्शवली. या वेळी किशोरी आमोणकर यांचे शिष्य मिलिंद रायकर, मनसे नेते नितीन सरदेसाई, अच्युत गोडबोले, आनंद इंगळे, वैभव मांगले, गायिका आरती टिकेकर, शशी व्यास, किशोरी आमोणकर यांचे शिष्य मंगेश बोरगावकर यांच्यासह कला क्षेत्रातील अनेकांनी हजेरी लावली होती. 

"संगीत क्षेत्रातील नामवंत व्यक्ती गेल्यामुळे मनाला हळहळ वाटत आहे.  त्या रसिकांशी आपल्या कलेतून नेहमीच संवाद साधत असायच्या," अशी प्रतिक्रिया महेश काळे यांनी दिली. 

"जितक्या प्रेमाने त्यांनी सुरांना कवटाळले होते. तितक्याच प्रेमाने त्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. किशोरी आमोणकर यांच्यासारखा कलाकार दुर्मिळ आहे. त्यांनी आपल्या तत्वांशी कधीच तडजोड केली नाही," अशी भावना शशी व्यास यांनी व्यक्त केली. 

Loading Comments