'मन्नत' बाहेर चाहत्यांची गर्दी

    मुंबई  -  

    वांद्रे - बॉलिवूडचा किंग शाहरुख खान याचा आज 51 वा वाढदिवस आहे. शाहरुखच्या वाढदिवसाला त्याचे चाहते मन्नत बंगल्याबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. चाहत्यांना भेटण्यासाठी शाहरुखही दरवर्षी बालकनीत येतो. मात्र दरवर्षीची ही परंपरा शाहरुखनं या वर्षी मोडली आणि त्याच्या चाहत्यांच्या पदरी निराशा पडली. शाहरुख कुटुंबासोबत बाहेर गेलाय. त्यामुळे तो आपल्या चाहत्यांना भेटू शकला नाही. त्याचे चाहते रात्रभर त्याच्या बंगल्यावर गर्दी करुन होते. त्याची एक झलक पाहण्यासाठी आतूर होते, मात्र चाहत्यांचा अपेक्षाभंग झाला. तरीही त्याच्या चाहत्यांनी आपआपल्या पद्धतीनं त्याचा वाढदिवस साजरा केला. कोणी केक कापून, तर कोणी त्याचा आगामी चित्रपट रईस मधील डायलॉग बोलून शाहरुखला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

    Loading Comments

    संबंधित बातम्या

    © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.