Advertisement

चित्रीकरण बंद तरीही कर्मचार्‍यांना मिळणार वेतन

प्रोड्युसर्स गिल्ड ऑफ इंडियाची माहिती

चित्रीकरण बंद तरीही कर्मचार्‍यांना मिळणार वेतन
SHARES

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रभावामुळे सरकारने नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचे आवाहन केले आहे. त्यासोबतच शाळा, महाविद्यालये, धार्मिक स्थळे आणि मॉल ही ठिकाणे काही दिवस बंद ठेवण्याचे आदेशही दिले आहेत. यामध्ये चित्रपट, मालिका, वेब सीरिज आणि जाहिरातींचे चित्रीकरण १९ ते ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, या काळात चित्रीकरण पूर्णपणे बंद जरी असलं तरीदेखील या दिवसांमधील वेतन कर्मचार्‍यांना देण्यात येणार आहे. प्रोड्युसर्स गिल्ड ऑफ इंडियाने घोषणा करत ही माहिती दिली.

हेही वाचाः- जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई- छगन भुजबळ

कोरोना विषाणूमुळे अनेक क्षेत्रातील कामकाज बंद करण्यात आले आहेत. यामध्ये कलाविश्‍वाचादेखील समावेश आहे. परंतु या क्षेत्रात काम करणार्‍या कर्मचार्‍यांचा विचार करता प्रोड्युसर्स गिल्ड ऑफ इंडियाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. एका मदतनिधीच्या माध्यमातून या कर्मचार्‍यांना वेतन दिले जाणार आहे. गिल्डचे अध्यक्ष सिद्धार्थ रॉय कपूरने ट्विट करत याविषयीची माहिती दिली. कोरोना विषाणूमुळे प्रत्येक क्षेत्रावर परिणाम झाला आहे. बरीचशी कामे ठप्प झाली आहेत. सगळीकडचे कामकाज बंद झाल्यामुळे हातावर पोट भरणार्‍या वर्गाला या सगळ्याचा जास्त फटका बसत आहे. त्यामुळेच प्रोड्युसर्स गिल्ड ऑफ इंडियाने अशा व्यक्तींसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. कलाविश्‍वात काम करणार्‍या कर्मचार्‍यांना आम्ही मदतनिधीच्या माध्यमातून शक्य तितकी आर्थिक मदत करणार आहोत. आम्ही आमच्या सहकार्‍यांना मदत करण्याचा प्रयत्न करु, असं सिद्धार्थ रॉय कपूरने सांगितलं.    

हेही वाचाः- भीमा-कोरेगाव हिंसाचारप्रकरणी शरद पवारांचीही होणार चौकशी

भारतातील महाराष्ट्र राज्यात कोरोनाचे (Corona Virus) लागण झालेले रुग्ण अधिक आढळल्यानं राज्य सरकारनं (State Government) अधिक खबरदार घेतली आहे. सुरक्षेसाठी शाळा, कॉलेज, थिएटर्स, पार्क, जलतरण, जिमखाने बंद करण्यात आले आहेत. अशातच आता चित्रपट (Picture) व मालिकांचे (Serials) चित्रीकरणही (Shooting) बंद करण्यात येणार आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे नाट्य आणि चित्रपटगृहे बंद करण्यापाठोपाठ आता ३१ मार्च पर्यंत चित्रपट, मालिका, आणि जाहिरातींचं (Advertiement) चित्रीकरण बंद करण्यात येणार आहेत.याबाबत रविवारी ‘इम्पा’ या ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिनेएम्पलॉइज’, ‘इंडियन मोशन पिक्चर्स प्रोडय़ुसर्स असोसिएशन’, ‘इंडियन फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हजन डिरेक्टर्स असोसिएशन’च्या संघटनेनं एकमतानं निर्णय घेतला होता.
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा